Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

5वी ते 12 वी वर्ग सुरक्षितपणे सुरु करणेबाबत..... 10 ऑगस्ट व 7 जुलै चा शासन निर्णय पहा

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्यात इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याबाबत सुधारित शासन निर्णय 7 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शाळा सुरु करणे संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.  

आता 10 ऑगस्ट च्या शासन निर्णयानुसार 5वी ते 12 वी पर्यंत चे वर्ग सुरु करणेबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या शासन निर्णयानुसार शहरी भागातील 8वी ते 12वी व ग्रामीण भागातील 5वी ते 12वी पर्यंत चे वर्ग सुरु करता येणार आहेत. 


मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने त्यांच्या दि. १४ जून, २०२१ च्या पत्रान्वये विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात दि.१५ जून, २०२१ पासून व विदर्भात दि. २८ जून, २०२१ पासून शैक्षणिक वर्ष सुरु करणेबाबत जाहिर केले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या उपायोजनांचा उल्लेखदेखिल सदर पत्रात करण्यात आला आहे. तसेच सदर पत्रान्वये वरील दिनांकापासून शिक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्देश देण्यात आले आहे. राज्यात कोविड संबंधी data / आकडेवारी व तज्ञांचे मत लक्षात घेता असे दिसते की, सध्या १० वर्षांपेक्षा कमी वयोगटाच्या मुलांना कोविड संसर्ग होण्याची सर्वात कमी शक्यता आहे, तसेच १८ वयापर्यंतच्या मुलांना सध्यातरी सदर संसर्ग होण्याची कमी शक्यता आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहेत व त्यामुळे त्यांच्यावर शारिरीक, मानसिक व psychological दुष्परिणाम होत आहे. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पुढे जाऊन जस-जसे दिवस जातील, तस-तसे सदर नुकसान भरून काढणे कठीण जाईल.

शाळा बंद व मुलं घरी राहण्याचे अजून जे दुष्परिणाम लक्षात आले आहेत त्यात socialization म्हणजे सामाजिक कौशल्यांचे नुकसान, मोबाईल / इंटरनेटचा गैरवापर व games चा addiction depression online शिक्षणापासून वंचित राहणे त्यामुळे मानसिक तणाव, काही मुलांनी केलेली आत्महत्या, domestic Violence चे वाढते प्रमाण, बाल विवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण, मुर्लीचे drop out व घर शेती कामात ठेवणे इ. मोठया प्रमाणावर सामाजिक नुकसान लक्षात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविड मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. 

महत्त्वाचे - 

इ. 1ली ते इ. 12वी साठी डी डी सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम 14 जून पासून सुरु.... प्रत्येक आठवड्याचे वेळापत्रक पहा. 

ग्रामीण भागातील इयत्ता 5वी ते इयत्ता १२वी चे वर्ग सुरु करण्यासाठीचे निकष

अ) ग्रामीण भागात कोविड मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा.

ग्रामपंचायत स्तरावर संरपंच यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती गठीत करावी.

१. सरपंच,     अध्यक्ष

२. तलाठी   सदस्य

३. अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती   सदस्य

४. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र,  निमंत्रीत सदस्य

५. ग्रामसेवक,    सदस्य सचिव

६. मुख्याध्यापक    सदस्य

७. केंद्रप्रमुख      सदस्य

समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी.


(1) शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळून आला सावा,

(2) शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करणे बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व शिक्षण अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.

(3) विद्यार्थ्याच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. 

(4) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी व विद्यार्थीचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकान्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.

ब) शाळा सुरू करताना मुलांना टप्या-टप्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक core विषयांसाठी प्राधान्य इ. ह्यासाठी सोबत जोडलेल्या SOP चे पालन करावे.

कोविड संबंधी सर्व precautions चे काटेकोरपणे पालन करावे. उदा. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.

क) संबंधीत शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी..

कोरोना मुक्त गावात शाळा सुरु करणे बाबतचा सुधारित शासन निर्णय (7 जुलै) डाउनलोड करा. 

कोरोना मुक्त ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरु करणे बाबतचा शासन निर्णय (10 ऑगस्ट) डाउनलोड करा. 

मार्गदर्शक SOP - शाळा सुरु करणे संदर्भात मार्गदर्शक SOP डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

1 Comments

  1. Shala chaluch hoil pahije..😊khup boring ahe gharat basun🙁😖

    ReplyDelete

close