Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेल्वे स्टेशनवर हमालाचे काम करणारा श्रीनाथ बनला आयएएस IAS अधिकारी. अभ्यासासाठी वापरले रेल्वेचे वाय फाय

रेल्वे स्टेशनवर हमालाचे काम करणारा श्रीनाथ बनला आयएएस IAS अधिकारी. अभ्यासासाठी वापरले रेल्वेचे वाय फाय

रेल्वे स्टेशन वर हमालाचे काम करत रेल्वे स्टेशनवरील मोफत वायफाय चा वापर करत श्रीनाथ ने UPSC अभ्यास करुन परीक्षा यश मिळविले आहे. त्याबद्दल सर्व देशातून त्याचे कौतुक होत आहे. 

ऑटो चालकाचा मुलगा ते वयाच्या 21 व्या वर्षी IAS 

अन्सार शेख IAS कसा झाला? त्याच्याच शब्दात पहा. संपूर्ण प्रवास  पाहण्यासाठी येथे टच करा.

 


हे ही वाचा

देशातील एकमेव उदाहरण - फक्त 2 खोल्या असलेल्या घरातील सख्खे चारही भाऊ-बहिण क्लास 1 अधिकारी IAS & IPS 

इच्छाशक्ती खंबीर असेल  आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याची तयारी असेल तर कोणतीही व्यक्ती सर्वात मोठे ध्येय गाठू शकते. मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर तुम्ही मात करू शकते. मूळचा केरळचा असलेल्या श्रीनाथचे यश हे त्यातील दुर्दम्य इच्छाशक्ती चे उदाहरण आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करणाऱ्यांसाठी ही मोठी शिकवण आहे. 

श्रीनाथची आयएएस अधिकारी होईपर्यंतची कहाणी खूप रंजक आहे. आयएएस होण्यापूर्वी तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हमाल म्हणून काम करायचा. कौटुंबिक खर्च भागवण्याइतपत मिळकत नसल्याने तो दुहेरी शिफ्टमध्ये काम करू लागला. तरीही अडचणी कायम राहिल्या पण त्याने मन खचू दिले नाही. प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे स्वप्न पक्के होते. पण त्या अभ्यासासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. अशाही परिस्थितीत त्याने जिद्द सोडली नाही. 

कौटुंबिक परिस्थितीमुळे श्रीनाथची जास्त फी भरण्याची ऐपत नव्हती. त्याने कसेतरी स्मार्टफोनची व्यवस्था केली. पण रिचार्ज साठी पैसे नव्हते म्हणून त्याने रेल्वे स्टेशनवरील मोफत वायफाय चा वापर करुन तयारी सुरू केली. अथक मेहनतीने श्रीनाथने केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. पण त्याचे ध्येय त्याहून मोठे होते. काही काळानंतर श्रीनाथने आयएएसची तयारी सुरू केली आणि चौथ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा दिली. व IAS बनला. 

माझ्यासमोर जी काही आव्हाने आली, ती आव्हाने मी संधी म्हणून पाहिली. तयारी दरम्यान विविध विचार आले. परंतु, मला यूपीएससी पास (UPSC Exam) करण्याची भूक होती जी चौथ्या प्रयत्नात पूर्ण झाली, असं श्रीनाथने (Srinath) सांगितलं आहे.


Post a Comment

0 Comments

close