शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी- 2025 ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करिता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
MHT-CET 2025 नोटिफिकेशन डाउनलोड करा. - Click Here
MHT-CET संदर्भात विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी-2025 ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे सादर करावायचे आहेत.
Join WhatsApp group
https://chat.whatsapp.com/LmO2x3FlXk07TIBvkhuVQl
दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम ग्रुपच्या फेर परीक्षेबाबत.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी २०२५ ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक ०९ एप्रिल, २०२५ ते २७ एप्रिल, २०२५ या कालावधीत पार पाडली आहे. सदर परिक्षेदरम्यान दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षेमध्ये उमेदवारांना गणित विषयाशी संबंधीत तांत्रिक अडचणी उद्भवल्याबाबत उमेदवारांनी ई-मेल, पत्र, टिकीट सिस्टम, दुरध्वनी आणि प्रत्यक्ष सीईटी कक्षास भेट देवून पालक / उमेदवारांनी आक्षेप / तक्रारी नोंदविल्या आहेत. उमेदवार/ पालक यांच्या तक्रारींची दखल घेवून तसेच उमेदवरांच्या शैक्षणिक हित लक्षात घेता पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे-
१. दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
२. त्याचप्रमाणे दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सकाळच्या सत्रात परीक्षा दिलेली आहे, अशा परीक्षेकरीता उपस्थित सर्व उमेदवारांची फेरपरीक्षा दिनांक ०५ मे, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे, याची संबंधीत उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.
३. सदर परीक्षेस उपस्थित राहीलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. या यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना फेरपरीक्षा देणे अनिवार्य असेल.
४. सदर फेर परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.
५. उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी राज्य सीईटी कक्षाच्या संकेतस्थळ www.mahacet.org वर नियमितपणे भेट द्यावी.
State Common Entrance Test Cell, MHT CET 2025 online Registration
MHT-CET 2025 ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि निश्चिती
गुरुवार, दिनांक 26/०2/२०२4 ते गुरुवार, 16/०3/२०२4 (रात्री ११.५९ वा.)
विलंब शुल्क (500रु) भरुन ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती
शुक्रवार, दिनांक ०26/०2/२०२4 ते गुरुवार, 16/०3/२०२4 (रात्री ११.५९ वा.)
MHT-CET 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा.
State Common Entrance Test Cell, MHT CET 2025 online Registration Click Here
MHT-CET Result 2025 - Click Here
एमएचटी सीईटी 2026 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता महत्वाच्या सुचना
एमएचटी सीईटी २०२4 साठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी एमएचटी सीईटी २०२4 साठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे सखोल वाचन करावे.
उमेदवाराने इयत्ता १० वी किंवा इयत्ता १२ वी च्या गुणपत्रीकेवरील नाव अर्ज भरताना त्याचं क्रमाने नमूद करावे.
उमेदवाराने स्वतःचा फोटो व सही योग्य पद्धतीने व योग्य Size मध्ये अपलोड करावे.
उमेदवाराने जर राखीव प्रवर्गामधून परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केला असेल, तर प्रवेश प्रक्रीयेपूर्वी खालील नमुद प्रमाणपत्रे तयार ठेवावीत
जात प्रमाणपत्र
वैधता प्रमाणपत्र
Non creamy layer certificate
उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा करण्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून भरलेली माहिती योग्य आहे याची खातरजमा करावी.
भरलेल्या माहिती मध्ये बदल करण्यासाठी Edit सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा केल्या नंतर भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
उमेदवाराने परीक्षा केंद्रांची निवड काळजीपूर्वक करावी.
कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास परीक्षा केंद्र बदलून मिळणार नाही.
उमेदवाराने अर्ज भरताना PCM किंवा PCB किंवा दोन्ही ग्रुपची नोंद काळजीपूर्वक करावी.
उमेदवारास परीक्षा देण्याकरिता प्रश्न पत्रिका इंग्रजी/मराठी/उर्दू या भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
उमेदवाराने अर्जभरताना प्रश्न पत्रिकेची योग्यती भाषा निवडावी.
उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा केल्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रिंट व अदा केलेल्या शुल्काची पावती प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवणे आवश्यक आहे.
उमेदवाराने विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा.
एमएचटी सीईटी २०२4 परीक्षेच्या अनुषंगाने या कार्यालयतर्फे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या जाहीर सुचनाच्या माहितीसाठी उमेदवाराने या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला अनियमितपणे भेट द्यावी.
MHT-CET 2024 अधिकृत संकेतस्थळ - Click Here
उमेदवाराने कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे Login Id व Password इतर व्यक्ती सोबत share करू नये.
उमेदवाराने परीक्षाअर्ज भरताना स्वतःचा मोबाईल न. व ई-मेल आयडी द्वावा, जेणेकरू, परीक्षेबाबतच्या सुचना संबंधित मोबाईल न. वर sms द्वारे पाठविण्यात येतील.
उमेदवारास अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी, संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईन न. वर संपर्क साधावा.
0 Comments