राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी शाळा, केंद्र व तालुका इत्यादी विविध स्तरावर 'सखी सावित्री समिती' गठन करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे.
सखी सावित्री समिती शासन निर्णय- Click Here
मुला-मुलींना घर, शाळा आणि समाजात सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे. तसेच त्यांचे सामाजिक, भावनिक, अध्ययन उत्तमरित्या व्हावे यासाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठीत करण्यात येणार आहे.
तालुका स्तर / शहर साधन केंद्रस्तर सखी सावित्री समिती रचना PDF
शाळा व्यवस्थापन समिती शासन निर्णय | स्थापना | पुनर्गठन | रचना व कार्य | ठराव नमूना - Click Here
तालुका स्तर / शहर साधन केंद्रस्तर सखी सावित्री समितीची कार्ये
१) तालुकास्तर समितीची दर तीन महिन्यातून एक (आवश्यकता भासल्यास अधिक वेळा) बैठका गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित करणे.
२) शाळा व केंद्र स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी केंद्रस्तर समिती व शाळास्तर समितीवर नियंत्रण ठेवणे.
३) व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) च्या माध्यमातून सामाजिक, भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत करणेसाठी कार्यक्षेत्रातील कंपन्यांशी संपर्क साधून मदत उपलब्ध करून घेणे, उपलब्ध मदत पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करणे.
शाळा स्तर - सखी सावित्री समिती रचना व कार्ये - Click Here
केंद्र स्तर - सखी सावित्री समिती रचना व कार्ये - Click Here
४) शाळास्तरावर व केंद्रस्तरावर निर्माण झालेल्या समस्यांचे समाधान व तक्रारींचे निवारण करण्यासाठी थेट तालुकास्तर समितीकडे तक्रार सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे.
५) मुला-मुलींच्या बालहक्क संरक्षणासाठी व समितीमार्फत शाळा व केंद्र स्तरावर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना प्रोत्साहन व प्रसिध्दी देणे.
६) तालुकास्तर समितीच्या कार्याचा अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सादर करावा, जेणेकरून जिल्हयातील कोणत्याही स्तरावर मुलामुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी समजू शकतील व त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल.
७) सदर समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत.
0 Comments