Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्र स्तर - सखी सावित्री समिती PDF | रचना व कार्ये | शासन निर्णय

राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी शाळा, केंद्र व तालुका इत्यादी विविध स्तरावर 'सखी सावित्री समिती' गठन करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. 


सखी सावित्री समिती शासन निर्णय- Click Here

मुला-मुलींना घर, शाळा आणि समाजात सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे. तसेच त्यांचे सामाजिक, भावनिक, अध्ययन उत्तमरित्या व्हावे यासाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती  गठीत करण्यात येणार आहे. 

केंद्र स्तर सखी सावित्री समिती रचना PDF




केंद्र स्तर सखी सावित्री समितीची कार्ये

१) केंद्रस्तर समितीची दरदोन महिन्यातून एक (आवश्यकता भासल्यास अधिक वेळा) बैठका केंद्रशाळेत आयोजित कराव्यात.

२) आपल्या कार्यक्षेत्रातील मुला-मुलींची १००% पटनोंदणी, १०० टक्के उपस्थिती, तसेच शाळाबाह्य व स्थलांतरीत पालकांच्या मुला मुलींचे १०० टक्के समायोजनासाठी शाळास्तर समितीला मार्गदर्शन करणे व कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणे. 

३) मुला-मुलींना करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकसन, मुलींसाठी स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण व कार्यक्षेत्रातील बालविवाह बंद करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शाळास्तर समितीला मार्गदर्शन करणे, व यासंबंधीचा अहवाल तालुकास्तर समितीकडे सादर करून योग्य कार्यवाहीसाठी प्रयत्न करणे तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा ( POCSO) अंतर्गत असलेल्या "ई-बॉक्स" व "CHIRAG" या अँपबाबत जागृती करणे. 


४) शाळास्तरावर राबविण्यात येणाऱ्या सर्व उपयोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी शाळास्तर समितीवर नियंत्रण ठेवणे. केंद्रातील कोणत्याही शाळेने या उपयोजनांची अंमलबजावणी योग्यरित्या केल्यास त्यांच्या प्रयत्नांना प्रसिद्धी व प्रोत्साहन देणे.
५) केंद्रस्तर समितीने कार्याचा अहवाल तालुकास्तर समितीच्या प्रत्येक ३ महिन्याच्या बैठकीत सादर करावा, जेणेकरून केंद्रातील कोणत्याही स्तरावर निर्माण झालेल्या समस्याचे समाधान करण्यासाठी तालुकास्तर समितीला तातडीने निर्णय घेणे शक्य होईल.
६) शाळास्तर समिती व तालुकास्तर समिती यांच्यामध्ये समन्वयाचे कामकाज करणे.
७) सदर समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत.

Post a Comment

0 Comments

close