Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

जिल्हा स्तरावर पुरस्कारप्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचे लाभ

जिल्हा स्तरावर पुरस्कारप्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचे लाभ देण्याबाबत आदेश. 

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना, जिल्हा शिक्षक पुरस्कार योजना ही जिल्हा परिषदेच्या स्तरावरुन राबविली जात होती. सदरची योजना राबविण्यासाठी शिफारसी करतांना काळजीपूर्वक शिफारसी न करता, काही शिक्षकांविरुध्द गुन्हे दाखल असतांनाही त्यांची पुरस्कारासाठी निवड केली जात होती. त्यामुळे ग्रामविकास विभागाने शासन परिपत्रक क्र. संकीर्ण- १०००/प्र.क्र.३२४१/१५, दिनांक १२.१२.२००० रोजी यासंदर्भात एकत्रित मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. या परिपत्रकात पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतन देण्याची तरतुद करण्यात आली. परंतु, आगाऊ वेतनवाढ देण्यासाठी होणारा खर्च ग्राम विकास विभागामार्फत देण्याची तरतुद नसुन, जिल्हा परिषदांनी त्यांच्या पुर्वीप्रमाणेच स्वनिधीतुन खर्च करावा अशी स्पष्ट तरतुद होती.

२. ६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीत शासनाने आगाऊ वेतनवाढ देण्याची योजना बंद केली. त्यामुळे ग्रामविकास विभागाने शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१८१/आस्था-१४, दिनांक ४.९.२०१८ व शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१८१/आस्था-१४, दिनांक ४.२.२०२० नुसार जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ०१ आगाऊ वेतनवाढ देण्याची योजना रद्द केली आहे. परिणामी, अनेक शिक्षकांनी मा. उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या मा. उच्च न्यायालयाने अशा याचिकांवर २०१८ पूर्वीच्या जिल्हा स्तरावरील पुररस्कारप्राप्त प्राथमिक शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा निर्णय अनेक याचिकांप्रकरणी दिला आहे. 

मा. उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने नाशिक जिल्हा परिषदेशी संबंधित रिट याचिका क्र. ८८१८/२०१८ प्रकरणी दिलेल्या आदेशाविरुध्द जिल्हा परिषदेमार्फत मा. सर्वोच्च न्यायालयात, विशेष अनुमती याचिका क्र. १९७३०/२०२१ दाखल केली होती. सदरची विशेष अनुमती याचिका मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १३.०४.२०२२ रोजी फेटाळली आहे. त्यामुळे मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे याद्वारे सर्व जिल्हा परिषदांना कळवण्यात येत आहे की, जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पूर्वीपासुन आगाऊ वेतनवाढ देण्यासाठीचा खर्च जिल्हा परिषद स्वनिधीतून केला जात होता. त्यामुळे दिनांक ४.९.२०१८ पर्यंतच्या जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्याची कार्यवाही जिल्हा परिषदांनी त्यांच्याकडील उपलब्ध निधीतून करावी.

आगाऊ वेतनवाढ देणेबाबतचे परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here


दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम PDF  इ. 2री ते इ. 10वी (30 दिवस) 

Bridge Course  PDF for Std 2 - Std 10 

Bridge Course सेमी इंग्रजी PDF डाउनलोड करा. 

सेतू अभ्यासक्रम (bridge course) इयत्तानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Post a Comment

0 Comments

close