Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन (51 वे) आयोजित करणेबाबत परिपत्रक. | State Level Science Exhibition

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन (51 वे) अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय  विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन 2023-24 आयोजित करणेबाबत चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

सन 2023-24 या शैक्षणिक 51 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 20 ते 24 फेब्रुवारी 2023 या दरम्यान 5 दिवस कालावधीत आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. 49 वे राज्यस्तरीय प्रदर्शन हे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आले होते. 50 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन हे ऑफलाईन स्वरुपात घेण्यात येणार आहे. 



यावर्षी एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली च्या संदर्भीय दिशानिर्देशान्वये विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय "तंत्रज्ञान आणि खेळणी"/ TECHNOLOGY AND TOYS असा निश्चित केला आहे. सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून पुढीलप्रमाणे एकूण सहा उपविषय निर्धारित केलेले आहेत.

1) माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती (Advancement in information and Communication Technology ) 

2) पर्यावरणास अनुकूल सामग्री Eco-Friendly Materials 

3) आरोग्य आणि स्वच्छता Healthy and Cleanliness 

4) वाहतूक आणि नवोपक्रम  Transport and lnnovation

5) पर्यावरणीय चिंता (Environmental Concerns)

6) वर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास (Historical Development with Current Innovation) 

7) आमच्यासाठी गणित (Mathematics For Us)

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन 49वे गट निहाय निकाल PDF डाउनलोड करा. Click Here


उपरोक्त उपविषयापैकी कोणत्याही एका उपविषयावर आधारित उच्च प्राथमिकस्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तरापर्यंतच्या (इयत्ता ९ वी ते १२ वी) शालेय विद्यार्थ्यांकडून प्रदर्शनीय वस्तू, प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प तयार करण्याचे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शाश्वत विकासासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम या मूळ संकल्पनेवर आधारित कोणताही उपविषय निवडण्याचे स्वातंत्र्य असेल.

एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली यांचे दिशानिर्देशान्वये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाकरिता मूल्यमापनासाठी उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी ) पर्यंत माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तर (इयत्ता ९ वी ते १२ वी) असे दोन गट निश्चित केलेले आहेत.

विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी यापूर्वीच्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेले वैज्ञानिक प्रकल्प प्रदर्शनीय वस्तूंचे पुन्हा यावर्षीच्या विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण व पुनरावृत्ती होणार नाही, तसेच इन्स्पायर अवार्ड (INSPIRE Award) प्रदर्शनात सहभाग घेतलेले विज्ञान प्रकल्प/वैज्ञानिक प्रतिकृती तालुकास्तरीय / जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पुन्हा मांडले जाणार नाहीत, त्याचप्रमाणे  बाजारातून रेडीमेड साहित्य विकत घेऊन विज्ञान प्रदर्शनात सादर करण्यात येणार नाही, याची दक्षता घ्यावी.

या विज्ञान प्रदर्शनात राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा सहभागी होतील. प्रत्येक शाळेतून वरीलपैकी एका गटात एका वैज्ञानिक प्रकल्पासह फक्त एकच विद्यार्थी सहभाग घेऊ शकेल.


विज्ञान प्रदर्शनाचा स्तर संभाव्य कालावधी 

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन - दिनांक 10 डिसेंबर ते 09 जानेवारी 2023

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन - दिनांक 10 जानेवारी व 9 फेब्रुवारी 2023

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन - दिनांक 20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2023


राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धा 2022-23

दरवर्षी प्रमाणे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य (माध्यमिक शिक्षकांचे प्रदर्शन व स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत फक्त माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक सहभागी होतील. माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक म्हणजे इयत्ता 9 वी ते 12 वी या स्तरापर्यंत पर्यंत शिकविणारे शिक्षक या स्पर्धेतून जिल्हास्तरावर एका उत्कृष्ट अशा माध्यमिक शिक्षकाच्या शैक्षणिक साहित्याची निवड करण्यात यावी. सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांनाही याबाबत कळवावे.


राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (प्राथमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धा 2022-23

सन 2006-07 या वर्षापासून राज्यस्तरावर प्राथमिक शिक्षकांनी तयार केलेल्या गणित व विज्ञान) शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. या चालू वर्षात सत्र 2022-23 या वर्षाची राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (प्राथमिक शिक्षकांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. प्राथमिक शिक्षक म्हणजे इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत शिकविणारे शिक्षक, तरी जिल्हयातील सर्व शाळांना या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कळवावे. या स्पर्धेतून जिल्हास्तरावर एका उत्कृष्ट अशा प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याची निवड करण्यात यावी.

राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक/ परिचर यांचे प्रायोगिक साधनांचे प्रदर्शन व स्पर्धा 2022-23 

सन 2006-2007 या वर्षापासून राज्यस्तरावर प्रयोगशाळा / सहाय्यक परिचर यांनी तयार केलेल्या गणित व विज्ञान) वैज्ञानिक उपकरण प्रतिकृतीचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांचे प्रायोगिक साधनाचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हास्तरावर वरील प्रमाणे प्रदर्शन आयोजित करावे व सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांना प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करावे.

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन 49वे निकाल PDF डाउनलोड करा. Click Here


निवड प्रक्रिया


(1) विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनीय वस्तु राज्यातील आदिवासी भाग असलेल्या जिल्हयांनी उच्च प्राथमिकस्तरा पर्यंतच्या गटातून इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंत) चार (4) माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून (इयत्ता 9 वी ते 12 वी) चार (4) अशा एकूण आठ प्रदर्शनीय वस्तू आणि बिगर आदिवासी जिल्हयांनी उच्च प्राथमिकस्तरापर्यंतच्या गटातून इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंत विद्यार्थी तीन (3) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून (इयत्ता 9 वी ते 12वी) तीन (3) अशा एकूण सहा (6) प्रदर्शनीय वस्तूंची मूल्यमापनाच्या निकषानुसार 50 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाकरीता निवड करावी.

(2) जिल्हास्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (इयत्ता 9 वी ते 12 वी ला शिकविणारे माध्यमिक शिक्षक) प्रदर्शन या स्पर्धेमधून एका उत्कृष्ट शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धेकरीता निवड करावी.

(3) राज्यस्तरावर अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (इयत्ता 1 ते 8 ला शिकविणारे प्राथमिक शिक्षक) प्रदर्शन या स्पर्धेतून एका उत्कृष्ट साहित्याची राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरीय प्रदर्शन व स्पर्धेसाठी निवड करावी.

(4) जिल्हास्तरावर प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांच्या वैज्ञानिक साधनाच्या प्रदर्शन व स्पर्धेमधून प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांच्या एका उत्कृष्ट वैज्ञानिक साधनांची निवड करावी. उपरोक्त 1 ते 4 मुद्यात नमुद केल्याप्रमाणे निवड यादी शिफारशीसह या संस्थेस पाठवावी. 

प्रदर्शनाचे आयोजन

प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी प्रदर्शनीय वस्तूंच्या मांडणीकरीता प्रत्येक गटातील प्रदर्शनीय वस्तूसाठी साधारणपणे 122 सेमी सेमी 274 सेमी एवढी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. विज्ञान प्रदर्शन शक्यतो शाळांच्या इमारती अथवा सार्वजनिक इमारतीमध्ये भरविण्यात यावे. प्रदर्शन (ऑफलाईन करण्याच्या स्थितीत) 

ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनीचे नियोजन आपल्या स्तरावरून करण्यात यावे. 


आवश्यक सूचना

1) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांनी जिल्हयातील सर्व शासन मान्यता प्राप्त उच्च प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांना परिपत्रक त्वरीत पाठविण्याची कार्यवाही करावी. परिपत्रक शाळांना उशिरा मिळाल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना विचार करण्यास फार थोडा वेळ मिळतो. त्याकरीता शाळांना लवकरात लवकर परिपत्रक पाठवावे जेणे करून दर्जेदार व नवनवीन प्रदर्शनीय वस्तू प्रकल्प तयार करण्यास पुरेसा वेळ मिळेल. 

2) गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाबाबतची माहिती प्रसार माध्यमांमार्फत जनसामान्यापर्यंत पोहचवावी. 

3) ऑनलाईन किंवा ऑफलाईन वालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दोन (2) दिवस कालावधीचे नमूद कालावधीतील आयोजित करावे. 

4) जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कालावधीत विज्ञान रंजन कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे.

5) प्रदर्शनाबाबतची माहिती प्रसार माध्यमाशिवाय चित्रपट गृह, व्हिडीओ गृह, रेडिओ, टी.व्ही व सिटी प्रदर्शनाची माहिती ग्रामीण जनतेला, केबल द्वारे प्रसिद्धीला देण्यात यावी. विद्यार्थ्यांना शिक्षकांना होण्यासाठी शिक्षण परिषद चर्चासत्रातून याद्वारे माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करावे, विज्ञान प्रदर्शन है केवल औपचारिकता राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी. 

6) प्रदर्शन वस्तूंची निवड तज्ञांमार्फत करतांना पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, यासाठी मागील पाच वर्षातील निवड झालेल्या तालुका व जिल्हास्तरावरील निवड याद्या तज्ज्ञांना पुरवाव्यात म्हणजे पुनरावृत्ती टाळता येईल. प्रदर्शनीय वस्तूंचे मूल्यमापन निकषानुसार वस्तुनिष्ठ व्हावे, याबाबत पालक व विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी. 

7) सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे 49 बालकांकरीता जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन होत आहे. त्या निमित्याने जनतेत जनजागृती करावी. राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन संबंधित राज्याचे नाव यथावकाश कळविण्यात येईल.

50 वे विज्ञान प्रदर्शन आयोजनाबाबतचे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

49 वे विज्ञान प्रदर्शन आयोजनाबाबतचे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here



Post a Comment

0 Comments

close