Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एमपीएससी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

२९ सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तारीख निश्चित करण्यात येऊन अंदाजित वेळापत्रक आयोगामार्फत जाहीर करण्यात आले आहे.


यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा या संवर्गातील विविध पदांसाठी जाहीर करण्यात आलेल्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.inhttps://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

MPSC Exam TimeTable 2023 - Click Here link 1

MPSC Exam TimeTable 2023 - Click Here link 2

Post a Comment

0 Comments

close