विज्ञान भारती, विज्ञान प्रसार आणि एनसीईआरटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विज्ञान मंथन ही परीक्षा दरवर्षी इयत्ता सहावी ते अकरावी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते.
विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेची उदिष्टे
1) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा.
2) निरीक्षण आणि तर्काच्या आधारावर विश्लेषण करण्याची क्षमता वृद्धिंगत व्हावी.
3) आपल्या देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या भरीव योगदानाबद्दलची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी.
4) भारतीय वैज्ञानिकांच्या कार्याचा परिचय व्हावा आणि त्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी ही या परीक्षेची उद्दिष्टे आहे.
सन 2023-24 या वर्षी ची थीम - भारतरत्न चंद्रशेखर वेंकटरमण यांची जीवनगाथा व भारतीय स्वातंत्र्य संग्राम
भारतीय वैज्ञानिकांच्या कार्याचा परिचय व्हावा आणि त्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या वर्षी थोर भारतीय वैज्ञानिक, नोबेल पारितोषिक विजेते भारतरत्न चंद्रशेखर वेंकटरमण यांची जीवनगाथा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी असणार आहे. भारतरत्न चंद्रशेखर वेंकटरमण यांचे चरित्र, भारताचे विज्ञान विश्वातील योगदान आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि विज्ञान हा विशेष अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम उपलब्ध होईल.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक माननीय कृष्णकुमार पाटील यांनी दिनांक 29/30 ऑक्टोबर 2023 रोजी नवभारत निर्मितीसाठी इयत्ता सहावी ते अकरावी मधील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी सर्वात मोठी विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा विद्यार्थी विज्ञान मंथन याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा नोंदणी प्रक्रिया व परीक्षेचे स्वरूप
सहावी ते अकरावीमधील मराठी तसेच इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील.
विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा परीक्षेचे स्वरूप
या वर्षी मुख्य परीक्षा २9 ऑक्टोबर २०२3 आणि ३० ऑक्टोबर २०२3 या दिवशी होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवशी आपल्या घरून अथवा शाळेमधून मोबाईलद्वारे (अँड्रॉइड) परीक्षा द्यायची आहे.
परीक्षेचा कालावधी हा दीड तास (९० मिनिटे) असणार आहे. सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत मोबाईलवर परीक्षेच्या ॲपवर लॉगिन करून कोणत्याही वेळी दीड तासामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.
मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांना देणे सोपे व्हावे म्हणून चाचणी परीक्षा (मॉक टेस्ट) दि. १ ऑक्टोबर पासून घेण्यात येणार आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच अन्य १२ भारतीय भाषांमध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना या भाषांपैकी कोणत्याही भाषेत परीक्षा देता येईल.
VVM Exam Syllabus PDF (Study Material) - Click Here
मुख्य परीक्षेचे स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असून या मध्ये १०० प्रश्न (१०० गुण) विचारले जातील.
विभाग अ मध्ये भारताचे विज्ञानातील योगदान, भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रमण यांची जीवनगाथा आणि भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि विज्ञान यावर आधारित ४० प्रश्न विचारले जातील. विभाग अ हा ४० गुणांचा असून यासाठी वेळ ३० मिनिटे असणार आहे.
विभाग ब मध्ये विद्यार्थ्यांच्या विज्ञान व गणित या शालेय अभ्यासक्रमातील विषयांवर आधारित ५० प्रश्न (५० गुण) आणि सामान्य तर्कशास्त्रावर आधारित १० प्रश्न (१० गुण) विचारण्यात येतील. विभाग ब हा एकूण ६० गुणांचा असून यासाठी वेळ ६० मिनिटे असणार आहे. जर विभाग अ मध्ये विद्यार्थ्यास २० गुण किंवा अधिक गुण मिळाले तरच विभाग ब चे मूल्यांकन करण्यात येईल.
विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा निकाल - 10 नोव्हेंबर 2023
विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसाठी राज्य व राष्ट्रीय शिबिर
राज्यातील सर्वाधिक गुण मिळविलेले प्रत्येक इयत्तेतील २० विद्यार्थी हे राज्यस्तरीय शिबिरासाठी (State Level Camp) पात्र ठरतील. तसेच राज्यस्तरीय शिबिरामध्ये सर्वाधिक गुण मिळविलेले प्रत्येक इयत्तेतील २ विद्यार्थी हे राष्ट्रीय शिबिरासाठी (National Camp) पात्र ठरतील. राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन हे 3, १0 किंवा 17 डिसेंबर २०२3 (या दिवसांपैकी कोणत्याही एक दिवशी) तर राष्ट्रीय शिबीराचे आयोजन हे 18 आणि 19 मे २०२4 यादिवशी करण्यात येणार आहे.
राज्य स्तरीय शिबीर आणि राष्ट्रीय शिबीर हे प्रयोग क्रिया, निरीक्षण आणि विश्लेषण क्षमता, परिस्थितीजन्य समस्येचे निराकरण करण्याची क्षमता सर्जनशीलता, नेतृत्वगुण इ. घटकांवर आधारित असेल. या शिबिरांची विस्तृत माहिती मुख्य परीक्षेनंतर देण्यात येईल.
विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये
१) राष्ट्रव्यापी महाप्रयोग - या वर्षी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहारशास्त्र आणि पर्यावरण या संकल्पनेवर आधारित एका महाप्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे. या प्रयोगात विद्यार्थी स्वताच्या दैनदिन भोजनामध्ये समाविष्ट असणाऱ्या अन्न पदार्थांचे पोषणमूल्य आणि त्याचा पर्यावरणावर होणार परिणाम यावर प्रत्यक्ष निरीक्षणांच्या आधारे अनुमान मांडणार आहेत. आपल्या घरूनच विद्यार्थी या प्रयोगामध्ये सहभागी होतील. प्रयोगाची माहिती नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल
२) सृजन प्रशिक्षण कार्यक्रम - या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय आणि क्षेत्रीय पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातील नामवंत संशोधन संस्थांमध्ये (ISRO DRDO CSIR BARC) स्वतः भेट देऊन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी साधारण १ ते ३ आठवडे असा असणार आहे.
३) भास्कर शिष्यवृत्ती - भास्कर शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय विजेत्यांसाठी आहे. एक वर्षासाठी रु. २००० प्रति महिना असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. सृजन प्रशिक्षणानंतर राष्ट्रीय विजेत्यांना एखादा प्रकल्प नेमून देण्यात येईल आणि त्या प्रकल्पाचे विषय तज्ज्ञांकडून मूल्यांकन केले जाईल, या मूल्यांकनानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.
४) रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र - राष्ट्रीय, क्षेत्रीय व राज्य स्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.
सध्या परीक्षेसाठी नोंदणी चालू आहे. नोंदणीची प्रक्रिया (Registration) अत्यंत सोपी असून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरच वैयक्तिकरित्या नोंदणी (Individual Registration) अथवा शाळेच्या माध्यमातून नोंदणी (Through School Registration) करता येईल. संस्थेमार्फत नोंदणीसाठी रु. २००/- शुल्क ठेवण्यात आलेले आहे.
विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा 2023 Prospect/ Boucher/ शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा नावनोंदणीचा अंतिम दि. 15 सप्टेंबर २०२3 आहे.
विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा नाव नोंदणी / रजिस्ट्रेशन लिंक VVM Registration - Click Here
VVM Exam Register as Individual student - Click Here
विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा अधिक महितीसाठी http://vvm.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
या परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये.
0 Comments