राज्यातील इ.१ ली ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या एकल मातांच्या (विधवा, घटस्फोटीत व परित्यक्त्या) मुलांची माहिती Google Sheet मध्ये भरुन तात्काळ सादर करणेबाबत परिपत्रक
महाराष्ट्रातील विधवा, घटस्फोटीत व परित्यक्त्या अशा एकल मातांची आर्थिक व सामाजिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. सदर महिला या मजुरी करुन जगतात व त्यांच्या मुला मुलींचे शिक्षण करतांना त्यांना खुप कठीण जाते. त्यामुळे अनेकदा या महिला त्यांच्या मुला-मुलींना शाळेतून काढून घेतात. त्यामुळे शिक्षण विभागातील या मुला-मुलींची संख्या संकलित करुन या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
याकरिता इ. १ ली ते १२ वी पर्यंतच्या मुला मुलींची संख्या मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या निर्देशानुसार संकलित करुन शासनास विहित नमुन्यात सादर करावयाची आहे. राज्यातील इ.१ ली ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या एकल मातांच्या मुलांची माहिती सोबत देण्यात आलेल्या Google Sheet मध्ये भरुन (Soft Copy) तसेच Hard Copy स्वाक्षरीसह विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तात्काळ संचालनालयास सादर करावयाची आहे.
माहिती भरण्यासाठी Google Sheet ची Link खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
https://docs.google.com/spreadsheets/d/1kzGfxs65G0kJzGxujzwgkL57jK0Azr1PglJhmOKE8/edit?gid=0#gid=0




0 Comments