Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पीएम श्री शाळा पोर्टल लॉगीन | PM SHRI schools Portal login | http://pmshrischools.education.gov.in

पीएम श्री शाळा ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) योजनेंतर्गत, संपूर्ण भारतात 14,500 शाळा विकसित आणि श्रेणीसुधारित करण्यात येणार आहेत. यासाठी सरकारने नवीन पोर्टल लाँच केलं आहे. या पोर्टलद्वारे विकासासाठी पात्र ठरणाऱ्या शाळांची निवड करण्यात येणार आहे.

PM SHRI schools - Prime Minister Schools for Rising India.


भारत सरकार द्वारे हा उपक्रम केंद्र सरकार/राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार/स्थानिक संस्थांद्वारे व्यवस्थापित 14500 हून अधिक PM श्री शाळांचा विकास करण्याच्या उद्देशाने आहे ज्यात केंद्रीय विद्यालय संघटन KVS आणि नवोदय विद्यालय समिती NVS यांचा समावेश आहे. ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत आणि काळजी घेतली जाते, जेथे सुरक्षित आणि उत्तेजक शिक्षण वातावरण आहे, जेथे विस्तृत  शिकण्याच्या अनुभवांची श्रेणी ऑफर केली जाते आणि जिथे चांगल्या भौतिक पायाभूत सुविधा आणि शिक्षणासाठी उपयुक्त संसाधने सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार एक समान, सर्वसमावेशक आणि बहुवचन समाज निर्माण करण्यासाठी ते व्यस्त, उत्पादक आणि योगदान देणारे नागरिक बनतील अशा प्रकारे ते विद्यार्थ्यांचे पालनपोषण करेल.

20 लाखांहून अधिक विद्यार्थी या योजनेचे थेट लाभार्थी होण्याची अपेक्षा आहे.  ही योजना शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेचे विविध आयाम समजून घेण्यास प्रोत्साहन देईल आणि धोरण, सराव आणि अंमलबजावणीची माहिती देईल.  या शाळांमधून मिळणारे शिक्षण देशातील इतर शाळांपर्यंत पोहोचवले जाईल.

पीएम श्री शाळा ही योजना 2022-23 ते 2026-27 या पाच वर्षांच्या कालावधीत लागू करण्याचा प्रस्ताव आहे.  


Read more about PM SHRI Schools - Click Here

पीएम श्री शाळा बाबत संपूर्ण माहिती वाचा. - Click Here


PM SHRI Schools

PM SHRI Schools will help showcase the implementation of the National Education Policy 2020 and emerge as exemplar Schools over a period of time.

पीएम श्री शाळा

पीएम श्री शाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीचे प्रदर्शन करण्यास मदत करतील आणि ठराविक कालावधीत आदर्श शाळा म्हणून उदयास येतील.

PM SHRI Portal login - शाळेचा UDISE व  HM Registered Mobile वरुन लॉगीन करता येईल. 

PM SHRI Schools Login link - Click Here

PM SHRI Schools Registration link -  Click Here

Login for National, State & District User link - Click Here

PM SHRI Schools Portal link - 

http://pmshrischools.education.gov.in/


केंद्र सरकारकडून सरकारी शाळांचा विकास करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पीएम श्री पोर्टल द्वारे एका विभागातील दोन शाळांची निवड करण्यात येईल. या निवडलेल्या शाळांचा सरकारकडून विकास करण्यात येईल. फक्त सरकारी शाळा या योजनेसाठी पात्र असतील. केंद्र सरकार या नव्या उपक्रमाद्वारे देशातील सरकारी शाळांचा कायापालट करत विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे.


PM SHRI योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील शाळा निवडीसाठी नोंदणी अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत.


PMSHRI योजनेंतर्गत समता, प्रवेश, गुणवत्ता व सर्व समावेशक समग्र व्यवस्था असणारी उदाहरण दाखल शाळा, इतर शाळांना मार्गदर्शक ठरेल अशाप्रकारे देशभरातील १४,५०० शाळा विकसित करावयाच्या आहेत त्यानुषंगाने केंद्रशासनाने देशभरातील १०,०८० शाळांची निवड केली असून आपल्या राज्यातील पहिल्या टप्प्यात ५१६ शाळा व दुसऱ्या टप्प्यात ३११ शाळा अशा एकूण ८२७ शाळांची निवड करण्यात आलेली आहे हे आपणांस ज्ञात आहे.

१. केंद्रशासनाने संदर्भिय पत्र क्र. १ अन्वये PM SHRI (PM Schools for Rising India) शाळा निवडीकरिताचा तिसरा टप्पा दि.१५/०४/२०२४ पासून सुरू करण्यात येत असल्याबाबत कळविले आहे.

२. तिसऱ्या टप्प्यातील PM SHRI योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता पारदर्शकपणे शाळा निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन कार्यपध्दतीतील सूचनांचा अवलंब करून Bench Mark Schools म्हणून निश्चित असलेल्या शाळांनी स्वयं नोंदणी करावयाची आहे. ऑनलाईन PMSHRI पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित मार्गदर्शक सूचनेनुसार शाळा नोंदणी व जिल्हास्तरावरून पडताळणीबाबतची कार्यवाही कालमर्यादेत करणे बंधनकारक आहे.

३. त्यानुषंगाने उपरोक्तबाबत आपल्या स्तरावरून विहित वेळेत खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करावी. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ज्या तालुक्यातील शाळांची निवड झाली नाहीत अशा तालुक्यांतील शाळा निवड प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त सहभागी होतील. ज्यामुळे शाळा निवडीपासून एकही तालुका वंचित राहणार नाही याची खात्रीपूर्वक दक्षता घ्यावी. आपल्या तालुक्यातील Bench Mark शाळांपैकी किती शाळांनी स्वयंनोंदणी केली वा केली नाही याबाबत नियमित अनुधावन करावे व त्या तालुक्यातील Bench Mark मधील सर्व शाळांना स्वयं नोंदणी करण्याकरिता प्रोत्साहन व मदत करावी. PM SHRI योजनेतंर्गत शाळा नोंदणी व जिल्हास्तरावरून पडताळणीबाबतची कालमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.

PM SHRI Schools Login link - Click Here

PM SHRI Schools Registration link -  Click Here


PM SHRI योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील शाळा निवडीसाठी नोंदणी अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत शासन परिपत्रक - Click Here


Post a Comment

0 Comments

close