Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र राज्यगीत PDF / Video / mp3 - जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा download PDF and Video | शासन निर्णय PDF डाउनलोड करा

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" चे औचित्य साधून राज्यातील तरुणाई तसेच समाजातील सर्वच नागरीकांना स्फुर्तीदायक असणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक असे राज्याचे अधिकृत राज्यगीत असावे, ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने, कवीवर्य श्री राजा नीळकंठ बढे लिखित "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" हे स्फुर्तीदायक गीत "राज्यगीत" म्हणून स्विकारण्यात आले आहे. 


स्वातंत्र्य दिनाचा 76वा वर्धापनदिन साजरा करणे बाबत परिपत्रक - Click Here.
Selfie with Tiranga - Click Here
हर घर तिरंगा - Click Here


राज्यगीत Video पहा - Click Here



राज्यगीत गायनाबाबत शासन निर्णय


कवीवर्य श्री राजा नीळकंठ बढे लिखित मूळ गीतामध्ये खालील प्रमाणे चार चरणे आहेत:-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

रावी ते कावेरी भारत भाग्याच्या रेषा

निळे निळे आकाश झाकते या पावन देशा

तुंग हिमालय, विंध्य अरवली, सह्याद्री निलगिरी

उत्तर दक्षिण वारे पाऊस वर्षविती भूवरी

रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी

एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी 

भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा || गर्जा.. ॥ १ ॥


भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा ॥ गर्जा..॥ २ ॥


गलमुच्छे पिळदार मिशीवर उभे राहते लिंबू

चघळत पाने पिकली करितो दो ओठांचा चंबू

मर्द मराठा गडी ओढतो थंडीची गुडगुडी

ठसक्याची लावणीतही ठसकदार गुलछडी 

रंगरंगेला रंगेल मोठा करितो रणमौजा || गर्जा ... ॥ ३ ॥


काळया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी

निढळाच्या घामाने भिजला

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तखा राखितो महाराष्ट्र माझा || गर्जा...॥  ४ ॥


या मुळ गीतामध्ये बदल करून शाहीर साबळे यांनी ३ चरणांचे खालीलप्रमाणे गीत गायले आहे:-


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥ धृ. ॥

रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी

एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी

भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा, जय जय महाराष्ट्र ॥ १ ॥ 


भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभु राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा ॥२॥


काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी 

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला 

देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥


विचाराधीन संपूर्ण गीत हे अत्यंत आशयपूर्ण, स्फुर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे असले तरी राज्यगीत हे विविध प्रसंगी सातत्याने सादर होणे अपेक्षित आहे.. त्यामुळे वेळ मर्यादेचे भान ठेऊन त्याचे संक्षिप्तीकरण होणे आवश्यक ठरते. सध्या प्रचलित असलेल्या सदर गीतातील २ चरणे मिळून त्यांचे नव्याने ध्वनीमुद्रण करुन ते मर्यादित वेळेत म्हणजेच दीड ते पावणे दोन मिनिटात बसविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे:-


शासन निर्णयः

१. कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करुन दोन चरणांसह खालीलप्रमाणे राज्यगीत स्वीकृत करण्यात येत आहे. या गीताचा कालावधी सुमारे १.४१ मिनीटे आहे.

महाराष्ट्र राज्यगीत - जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥ धृ ॥ 

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा 

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा 

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥ १ ॥


काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी 

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी 

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा 

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥ २ ॥


महाराष्ट्र राज्यगीत PDF डाउनलोड करा. - Click Here

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा PDF-Click Here

Maharashtra state song PDF- Click Here

Jay Jay Maharashtra Majha, Garja Maharashtra Majha song PDF- Click Here


महाराष्ट्र राज्यगीत शासन निर्णय डाउनलोड करा. Click Here

राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, राज्यगीत वाजविले / गायले जाईल याबाबत शासन निर्णय 15 मार्च 2024 - Click Here


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जय जय महाराष्ट्र माझा हे गीत दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात येत आहे. राज्य गीत सुमारे १.४१ मिनिटात वाजविता / गाता येईल.


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2023 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here



३. राज्यगीत" गायन वादन यासंदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करण्यात यावे:-


१. विचारार्थ राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील,

२. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे. 

३. १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायिले जाईल.

४. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, राष्ट्रगीत / परिपाठ / प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले / गायले जाईल.

५. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील.

६. राज्यगीत सुरु असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल. 

७. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/ गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा. 

८. वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल. 

९. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.

१०. या राज्यगीताच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीसाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त आस्थापनांस / कार्यालयांस सूचना द्याव्यात.

११. माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून राज्यगीताचा प्रचार प्रसार करण्यासाठी विशेष मोहिम आखण्यात यावी. त्यासाठी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे तसेच समाज माध्यमांचाही सुयोग्य वापर करण्यात यावा. 

१२. या राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.


४. सर्व शासकीय कार्यालये/ निम शासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित आस्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम, स्वयंसेवी संस्था व खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन या शासन निर्णयाद्वारे करण्यात येत आहे.


५.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर गीत दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ पासून "महाराष्ट्राचे राज्यगीत" म्हणून अंगिकारण्यात येत आहे. राज्य गीत सुमारे १.४५ मिनिटात वाजविता / गाता येईल.


६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२३०२०१५९००१०८४०७ असा आहे.


राज्य गीत महाराष्ट्र mp3 download

maharashtra rajya geet mp3 song download

जय जय महाराष्ट्र माझा pdf

rajya geet mp3 download

राज्यगीत mp3 download

rajyageet of maharashtra download


Post a Comment

0 Comments

close