Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक प्रेरणा परीक्षा प्रश्नपत्रिका PDF | परीक्षा ऐच्छिक असले बाबत परिपत्रक पहा. | परीक्षा आयोजन, प्रश्नपत्रिका स्वरुप, अभ्यासक्रम Teacher Motivation Exam

औरंगाबाद विभागांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये इ. 1 ली ते 10 वी पर्यंतच्या वर्गाना अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या शाळांतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रस्तूत परीक्षा आयोजनाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय यंत्रणा व सर्व संबंधितांनी आयोजन करावे.


शिक्षक प्रेरणा परीक्षा आयोजनाचे उद्देश

शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे, 

त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी, 

विषयज्ञान वृद्धिंगत होण्याची संधी निर्माण व्हावी. 

स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी. 

विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकाची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी, 


या हेतूने शिक्षक प्रेरणा परीक्षेसंदर्भात विभागातील सर्व शिक्षक संघटनांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. प्रस्तुत सभेत विविध शिक्षक संघटनांनी आपली भुमिका विषद करत शिक्षक प्रेरणा परीक्षेस अनुमोदन दिले. 

त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे परीक्षेसंबंधी कार्यवाही पार पाडावी. 

विभागीय परीक्षा संनियंत्रण समिती :-

अध्यक्ष विभागीय आयुक्त

सदस्य सचिव संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, औरंगाबाद

सदस्य उपायुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद

सदस्य विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद विभाग

सदस्य विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 संपूर्ण माहिती व शासन निर्णय - Click Here


विभागस्तरीय संनियंत्रण समितीचे कर्तव्ये व जबाबदाऱ्या :-

1. प्रश्नपत्रिका तयार करणे व प्रश्नपत्रिकेची प्रत सीलबंद स्वरूपात जिल्हा परीक्षा संनियंत्रण समितीस सुपूर्द करणे.

2. समिती सदस्यांनी विभागीय आयुक्त यांचे मान्यतेने जिल्ह्यांना पत्रव्यवहार करणे,


जिल्हास्तरीय परीक्षा सनियंत्रण समिती :- 

अध्यक्ष जिल्हाधिकारी

सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य सचिव शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक)

सदस्य अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा 

सदस्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रति, जिल्हा परिषद

सदस्य प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था



आर्थिक नियोजन समिती (जिल्हा स्तर) : 

अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य लेखाधिकारी वर्ग-1 वित्त विभाग, जिल्हा परिषद

सदस्य शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

सदस्य शिक्षणाधिकारी (माध्यमिक)


आर्थिक नियोजन समितीची कर्तव्ये व जबाबदाऱ्या :-

प्रस्तुत परीक्षेच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई, ओएमआर मशिनवर उत्तरपत्रिका तपासणी व उत्तीर्ण परीक्षार्थीसाठी प्रमाणपत्र छपाई, बक्षीसवस्तु व इतर अनुषंगीक बार्बीवर येणाऱ्या खर्चाचे आर्थिक नियोजन करणे.


प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई, सिलिंग, उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांसाठी कस्टडी रूम इ.

उपरोक्त बाबीची जबाबदारी खालील समितीवर सोपवावी.

अध्यक्ष अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद .

सदस्य शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 

सदस्य शिक्षणाधिकारी (माध्यमिक)


शिक्षक प्रेरणा परीक्षा 30 जुलै व 31 जुलै रोजी |परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक बाबत सविस्तर सूचना शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here


29 जुलै 2023 चे परिपत्रक - शिक्षक प्रेरणा परीक्षा ऐच्छिक असले बाबत 29 जुलै 2023 आजचे परिपत्रक - Click Here



शिक्षक प्रेरणा परीक्षा प्रश्नपत्रिका PDF - Click Here

Chemistry Question Paper - Click Here

Biology Question Paper - Click Here

Physics Question Paper - Click Here


शिक्षक प्रेरणा परीक्षेची काठीण्यपातळी ही NEET / JEE  परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे होती. 

शिक्षक प्रेरणा परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी खाली स्क्रोल करा. 


जिल्हास्तरीय शिक्षक प्रेरणा परीक्षा संनियंत्रण समितीची कर्तव्ये जबाबदाऱ्या :-

1. प्रस्तुत परीक्षा ही शिक्षकांना विषयज्ञानात पारंगत करून त्यांचे विषयज्ञान वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने घेण्यात येत असुन यापरीक्षेचा त्यांचे सेवाविषयक बाबीवर कुठलाही परिणाम होणार नाही. यादृष्टीने घेण्यात येत असलेसंबंधी संबंधितांना जाणीव करून दयावी.

2. जिल्हा परिषद प्रशासनाच्या इ. 1ली ते इ.10 वी अध्यापन करणाऱ्या व शिक्षक प्रेरणा परीक्षेस बसण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांची यादीसह संख्या अंतिम करावी. (याकामी शिक्षकांकडून अनुवेदन मागवून परीक्षेसाठी संख्या निश्चित करावी) 

3. शिक्षक प्रेरणा परीक्षेस बसण्यास इच्छुक नसणाऱ्या शिक्षकांची यादी करुन संख्या निश्चित करावी. 

4. विभागस्तरावरुन प्राप्त परीक्षार्थीच्या प्रमाणात छपाई करुन घ्यावी. (प्रश्नपत्रिकेचा A, B, C संघ विचारात घ्यावा) 

5. परीक्षार्थीच्या प्रमणात उत्तरपत्रिकाची छपाई करावी. (OMR मशीनवर तपासणी केली जाईल )

6. परीक्षा केंद्र निश्चिती करणे, परीक्षा दालनांवर पर्यवेक्षक केंद्रचालक झोनल ऑफीसर इ.ची नियुक्ती करणे,

7. प्रत्येक परीक्षार्थीस बैठक क्रमांक देऊन केद्रांवर परीक्षार्थीची आसन व्यवस्था करणे 

8. प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका सीलबंद स्वरुपात परीक्षा केंद्रावर पोहोच करणे

9. प्रश्नपत्रिका तपासणी करणे OMR मशीन्सची व्यवस्था करणे (ऋण गुण विचारात घेऊन निकाल तयार केला जाईल यापमाणे)

10 परीक्षा पार पडल्यानंतर उत्तरपत्रिका सीलबंद स्वरूपात जिल्हा कक्षात जमा करून घेणे. 

11. प्रत्येक उत्तरपत्रिकेस बारकोडींग करणे. 

12 उत्तरपत्रिका ओएमआर मशीनवर तपासणी करून घेणे.

13. जिल्हास्तरावर अंतिम निकाल तयार करणे, 50% पेक्षा अधिक गुण प्राप्त परीक्षार्थ्यांना उत्तीर्ण म्हणून घोषीत करने. 

14 परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका तपासणी करून सीलबंद करून जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करणे

15. उत्तीर्ण परीक्षार्थीची यादी प्रसिद्ध करणे व त्यांचे करिता प्रमाणपत्र तयार करणे

16. विहीत प्रपत्रात माहिती जिल्हा कक्षात ठेवणे. 

17. परीक्षा कामांसाठी जसे (पानपत्रिका उत्तरपत्रिका छपाई परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाची नेमणूका करणे, केंद्रचालकाची नेमणूक करणे परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका पोहोच करणे, परत कार्यागात जमा करण परीक्षार्थी उपस्थिती जात तयार करणी, उत्तरपत्रिकांना बारकोडींग करणे, OMR मशीनवर उत्तरपत्रिकांची तपासणी करणे गुण विचारात घेऊन निकाल तयार करणे, विविध विहित प्रपत माहिती तयार करणे, परीक्षेच्या अनुषंगाने तदर्प कामे पार पाठ इ. कामांसाठी अतिरिक्त कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती करून विविध कामाची जबाबदारी सोपविणे.

18. विभागीय स्तरावरुन देण्यात येणारा अभ्यासक्रम शिक्षकाच्या निदर्शनास आणणे. 



शिक्षक प्रेरणा परीक्षा आयोजनाच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही- . 

1) परीक्षा ही वैश्विक स्वरूपाची असेल परंतु प्रस्तुत परीक्षेच्या निकालानिरुप कुठलीही कारवाई शिक्षकांवर केली जाणार नाही याची शिक्षक जाणीव करून देऊन अधिकाधिक शिक्षक परीक्षेस प्रविष्ठ होतील व आपली विषयज्ञान पातळी आजमावून स्वयंअध्ययन करतील याअनुषंगाने कार्यवाही करावी 

2) परीक्षाठी विदिनिष्ठ केलेला अभ्यासक्रम सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणावा. 

3) जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्रशासनाच्या इ. 1 ते 10 वी पर्यंत अध्यापन करणारे शिक्षक यांना शिक्षक प्रेरणा परीक्षेत सहभागी करून घ्यावे.

4) शिक्षक परीक्षाथ्र्यांना बैठक क्रमांक दयावा. बैठक क्रमांकास जिल्ह्याच्या आद्याक्षरापासून सुरुवात करावी. (उदा. औरंगाबाद A-1, जालना J-1. याप्रमाणे)

5) परीक्षा देणाऱ्या शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर परीक्षा केंद्र संख्या निश्चित करावी 

6) परीक्षेची प्रश्नपत्रिका विभागस्तरावरून A, B, C या संघाप्रमाणे तयार करून दिली जाईल.

7) जिल्हयाने परीक्षार्थी शिक्षकांच्या प्रमाणात प्रती तयार करून घेऊन परीक्षेचे नियोजन करावे (प्रश्नपत्रिका या A, B, C या संघाप्रमाणे असतील. त्याप्रमाणे शिक्षक परीक्षार्थीना त्या वितरित कराया सलगच्या दोन शिक्षकांना समान संचाच्या प्रश्नपत्रिका मिळणार नाही. याप्रमाणे आसन व्यवस्था करावी,

8) प्रश्नपत्रिकेवर परीक्षार्थी यांचा आसन क्रमांक नमुद करावा, तसेच उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थीच्या प्रश्नपत्रिकेचा क्रमांक नमुद करावा. प्रत्येक उत्तरपत्रिकेस बारकोडिंग करावे. विभागात परीक्षेसाठीचा दिनांक व वेळ ही सर्व जिल्हयांसाठी एकच असेल.

9) परीक्षेचा दिनांक व वेळ, विहीत प्रपत्रे, पेपर तपासणीचा दिनांक स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.

10) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र या विषयांवर प्रत्येकी 50 प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल

शिक्षक प्रेरणा परीक्षा प्रश्नपत्रिका PDF - Click Here

Chemistry Question Paper - Click Here

Biology Question Paper - Click Here

Physics Question Paper - Click Here


11) प्रत्येक प्रश्नपत्रिका ही 50 प्रश्न असलेली वस्तुनिष्ठ स्वरूपाची व 50 गुणांची असेल, प्रत्येक प्रश्नास 01 गुण दिला जाईल

12) चुकीच्या एका उत्तरासाठी 0.5 गुण वजा केले जातील.

13) परीक्षेची वेळ ही प्रत्येक विषयासाठी 01 तासांची असेल. 

14) परीक्षेकामी पर्यवेक्षक केंद्रसंचालक याची नियुक्ती जिल्हा संनियंत्रण समिती करेल

15) उत्तरपत्रिका या ओएमआर मशीनवर तपासल्या जातील अशा स्वरूपाच्या असतील.

16) उत्तरपत्रिकाची छपाई ही जिल्हास्तरावर केली जाईल.

17) उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थीचे आसन क्रमांक नोंदवून घेतला जाईल. 

18) उत्तराच्या योग्य पर्यायावर गोल करण्यासाठी काळ्या शाईच्या पेनचा वापर करावा.

19) उत्तर पत्रिकेवर उत्तर नोंदवितानाच्या व इतर नोंदीच्या सूचना उत्तर पत्रिकेच्या मलपृष्ठावर देण्यात याव्यात.

20) परीक्षा संपन्न झाल्यानंतर परीक्षार्थीची उपस्थिती यादी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका या पर्यवेक्षक केंद्रसंचालकांकडे जमा करतील. केंद्रसंचालक या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व उपस्थिती अहवाल स्वतंत्ररित्या सीलबंद करून जिल्हा कक्षाकडे सुपूर्द करतील 

21) परीक्षा संपन्न झाल्यानंतर जिल्हा कक्ष प्रत्येक उत्तरपत्रिकेस बारकोडींग करेल. तसेच ओएमआर मशीनच्या सहाय्याने उत्तरपत्रिकांची तपासणी करून परीक्षार्थीनी संपादन केलेल्या गुणांची विषयनिहाय यादी तयार करेल, (गुणांची यादी करत असतांना ऋण गुण मिळालेल्या गुणांमधून विजा केले जातील व अंतिम निकाल तयार केला जाईल.) 

22) परीक्षेमध्ये अंतिम गुणांच्या आधारे एकुण गुणांपैकी 50% व त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या परीक्षार्थ्यास उत्तीर्ण ठरविले जाईल. अंतिम निकाल तयार झाल्यानंतर जिल्हास्तरावर गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या 50 परीक्षाधी नावे, उत्तीर्ण परीक्षार्थींची नावे व एकूण निकाल जिल्हास्तरावर घोषीत करावा.

23) गुणानुक्रमे जिल्हयातून प्रथम येणान्या 50 परीक्षार्थीना सत्कारपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करून CSR / सेस फंडातून भेटवस्तु देऊन जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार करावा..


शिक्षक प्रेरणा परीक्षेसाठी अभ्यासक्रम :-

इ. 5 वी ते 12 वी पर्यतच्या SCERT NCERT पाठ्य पुस्तकामधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र इ. विषयासंबंधीचा अभ्यासक्रम राहील. उपरोक्त प्रमाणे सर्व संबंधितांनी परीक्षेचे नियोजन करावे, तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणावा. परीक्षेची दिनांक व वेळ ही स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.

शिक्षक प्रेरणा परीक्षा आयोजन व संयोजन बाबत परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

शिक्षक प्रेरणा परीक्षा अभ्यासक्रम डाउनलोड करा. Click Here

शिक्षक प्रेरणा परीक्षा प्रश्नपत्रिका PDF - Click Here

Chemistry Question Paper - Click Here

Biology Question Paper - Click Here

Physics Question Paper - Click Here


परीक्षेची गोपनीयता व दर्जा राखण्याची जबाबदारी ही सर्व संबंधित जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी, जि.प यांची राहील. केलेल्या नियोजनास बाधा न पोहचता सर्व संबंधित मुख्यजिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प हे आपल्या कल्पकेची भर घालून परीक्षा या अधिक सुरळीत व आनंददायी वातावरणात पार पाडणेस सक्षम राहतील.

Post a Comment

0 Comments

close