Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू झाल्यास शिक्षणाधिकारी जबाबदार

जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांच्यावर व्यक्तीगत जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. 

महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ व महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) नियम, २०२० अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. परंतु, अनेक संस्थांनी शासनाची मान्यता न घेता अनधिकृतपणे शाळा सुरू केल्याचे निर्दशनास आले आहे. अशा अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. सबब, विद्यार्थांचे शैक्षणिक हित विचारात घेता भविष्यात यापुढे अनधिकृत शाळा सुरू होऊ नयेत याकरीता सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णयः-

"यापुढे राज्यातील कोणत्याही भागात नवीन अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांना व्यक्तीशः जबाबदार धरण्यात येईल व संबंधित शिक्षणाधिकारी यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल."

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२३१२१८१८२५४७५९२१ असा आहे. शासन निर्णय डाउनलोड करा. Click Here


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2023 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click HerePost a Comment

0 Comments

close