Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यसेवा परीक्षा 2025 पासून लेखीच, पुढील काळात मुख्य परीक्षा सोडून सर्व परीक्षा ऑनलाइन स्वरूपात

राज्यसेवा परीक्षा 2025 पासून लेखीच, पुढील काळात मुख्य परीक्षा सोडून सर्व परीक्षा ऑनलाइन स्वरूपात होतील अशी माहिती किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्यातर्फे आयोजित 'संवाद टॉपर्स मार्गदर्शन राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाताना...' या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२५ पासून राज्यसेवा परीक्षा लेखी स्वरूपातच घेतली जाणार आहे. त्यात कोणतेही दुमत नाही. एकविसाव्या शतकाकडे जाताना हा पर्याय स्वीकारणे गरजेचे आहे. तसेच संगणकीय क्षेत्रात वाढ होत असून या पुढील काळात मुख्य परीक्षा सोडून सर्व परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेण्याचा आयोगाचा मानस असून ती प्रक्रिया लवकरच होईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी रविवारी पुण्यात स्पष्ट केले.

अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्यातर्फे आयोजित 'संवाद टॉपर्स मार्गदर्शन राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाताना...' या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी अर्हम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश पगारिया, वास्तव कट्टयाचे किरण निंभोरे, महेश बडे उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्यसेवा परीक्षेत मुलींमधून प्रथम आलेल्या पूजा वंजारी, ओबीसी प्रवर्गातून द्वितीय आलेल्या सोनल सूर्यवंशी, नववी रँक मिळवणारा वैभव पडवळ आणि २८वी रँक मिळवणारा विशाल नवले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 


जीवन फार सुंदर असून जे यशस्वी झाले ते पुढे जातीलच पण जे मागे राहिले. त्यांनी प्रेरणादायी पुस्तके वाचून प्लॅन बी राबवणे गरजेचे आहे. चार अटेम्प्टपर्यंत ठीक आहे; परंतु त्यापुढे प्लॅन बी तयार ठेवणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करून किशोरराजे निंबाळकर म्हणाले, जेव्हा आम्ही संगणकीय डाटा चाळतो. त्यावेळी असे लक्षात येते परीक्षा होऊन निकाल जाहीर झाल्यावर ट्रेनिंगचा कालावधी संपतो त्यावेळी अनेकांची 45 तर काहींची 38 वर्षे पूर्ण झालेली असतात. त्यामुळे सरकारी नोकरीचे आकर्षण असले तरी स्किल इंडियासारख्या उपक्रमातून उद्योग क्षेत्रात काम केले पाहिजे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना किशोरराजे निंबाळकर म्हणाले, आपण पुण्यात कशासाठी आलो आणि काय करतोय व कोणत्या दिशेने जाणे गरजेचे आहे, माझे आई वडील काय करतात, कोणी तरी सांगितले म्हणून मी येथे आलो, पण एक, दोन, तीन, चार अटेम्प्टपर्यंत आपलेल्या सीमित करणे करणे गरजेचे आहे. आपण कोणत्या ठिकाणाहून आलो आणि आपली पार्श्वभूमी काय यांचा फारसा फरक पडत नाही. पण आपण खरंच या स्पर्धेत टिकणार आहोत का यांची स्वतःला स्वतःची परिस्थिती अंजमवता येते. सरकारी नोकऱ्यांचे आकर्षण सर्वांनाच आहे. पण सरकारी नोकऱ्या सोप्या राहिल्या नाहीत. परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर मोबाईलपासून व सोशल मिडियापासून दूर रहा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

शैलेश पगारिया म्हणाले, विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य दिशा मिळावी यासाठी आशा मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजजन केले जाते. काहींची आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेकांना उचित मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे अर्हम फाऊंडेशनतर्फे अशा कार्यक्रमातून दिशा दाखवण्याचे काम केले जाते. तसेच चुकून अपयश आल्यास प्लॅन बी कसा तयार करावा, याबाबतही मार्गदर्शन केले जाते.

 

आपण स्पर्धेत उतरलेले अश्व आहोत. मनात आणले तरच आपण जिंकू 66 शकतो. उजळणी हाच यशाचा मार्ग असून त्यात सातत्य ठेवा." अभ्यासाचा वेळ वाया जाऊ देऊ नका. - सोनल सूर्यवंशी, ओबीसी प्रवर्गातील द्वितीय विद्यार्थिनी

 

इच्छाशक्ती आहे म्हणून तयारीसाठी येथे आला आहात. ९० टक्के अभ्यास हा आपल्यालाच करावा लागतो. मार्गदर्शनाचा केवळ १० टक्के फायदा होतो. परीक्षेला जाताना सकारात्मक राहिले पाहिजे. - पूजा वंजारी, राज्यसेवा परीक्षेत मुलींमधील प्रथम विद्यार्थिनी अभ्यास करताना प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे आहे. संकल्पना समजून घेऊन अभ्यास करावा. - वैभव पडवळ, नववी रँक मिळविणारा विद्यार्थी

 

'अभ्यासाचे योग्य नियोजन करून नोट्स काढा. ही शेवटची परीक्षा आहे असेच समजून प्रयत्न करा,' असे विशाल नवले यांनी सांगितले.

 

शैलेश पगारिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर महेश बडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. अश्विनी टव्हारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर राहुल शिंदे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments

close