मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानाच्या राज्यस्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत विजेत्या शाळांना आदेशात करणेबाबत , विजेत्या शाळांची यादी पहा.
राज्यात "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" हे अभियान खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले असून राज्यातील सुमारे ९८ हजार शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवतेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम राज्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे घेतले आहेत. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमूख घटकांवर आधारीत एकूण १५० गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आलेले आहे.
"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने तर खाजगी शाळा गटातून अकोला येथील प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा या शाळेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दिपक केसरकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी ५१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान विजेत्या शाळांना मिळणार एवढी रक्कम - Click Here
या संदर्भातील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राज्य पातळीवरील, विभाग पातळीवरील व राज्याच्या राजधानी मुंबई मधील विजेत्या शाळांसाठीचा पारितोषिक वितरण समारंभ मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (वित्त), मा. उपमुख्यमंत्री (गृह) व मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दिनांक १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस (एनसीपीए), एनसीपीए मार्ग, नरिमन पॉईंट. मुंबई ४०००२ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानात राज्यस्तरावर, विभाग स्तरावर राज्याच्या राजधानी मुंबईमधील व राज्यातील अ व ब महानगरपालिका क्षेत्रांमधील विजेत्या नमूद ६६ शाळांच्या पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहणेबाबत अवगत करण्यात यावे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा-2 राज्यस्तरीय, विभागस्तरीय विजेत्या शाळांची यादी डाउनलोड करा. - Click Here
जिल्हास्तरीय विजेत्या शाळांची यादी डाउनलोड करा. - Click Here
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा दुसरा टप्पा निकाल संपूर्ण यादी - Click Here
राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी ५१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ३१ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला १५ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ११ लाखांचे पारितोषिक मिळणार आहे.
जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला ११ लाख, द्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल.
त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
0 Comments