Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बालवाड्या, अंगणवाड्यांनाही पाठ्यपुस्तके, जूनपासून अभ्यासक्रम लागू होणार

बालवाड्या, अंगणवाड्यांनाही पाठ्यपुस्तके, पूर्व प्राथमिकसाठी जूनपासून अभ्यासक्रम लागू होणार - शरद गोसावी शिक्षण संचालक mpsp

इयत्ता 1ली ते 12वी सर्व पाठ्यपुस्तके डाउनलोड करा. Click Here



राज्यात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीस येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरवात होताना दिसेल. पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक शिक्षणात नेमके काय शिकवायला हवे याचा अभ्यासक्रम तयार झाला आहे. त्यानुसार बालवाड्या आणि अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळतील. त्याची छपाई बालभारतीमध्ये सुरू आहे,' अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शनिवारी 'सकाळ'च्या व्यासपीठावरून दिली.


'सकाळ' आयोजित 'सकाळ विद्या स्कूल एक्स्पो २०२४'चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, 'राज्यात आजवर तीन ते सहा वर्ष वयोगटातील पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी ठोस आराखडा नव्हता. आता तयार झालेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होईल.'

एनईपी'च्या अंमलबजावणीबाबत ते म्हणाले, "एप्रिल २०२४ आले तरीही या पातळीवर प्रत्यक्ष दिसण्यासारखे काय झाले किंवा त्यादृष्टीने बदल कधी होणार असे प्रश्न अनेकजण सतत विचारतात. हे धोरण टप्प्या-टप्प्याने पुढे जाणार आहे. २०३० पर्यंत या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. याची सुरवात पूर्वप्राथमिक स्तरावरून होईल. लवकरच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल.


आकलन क्षमतेला मिळणार वाव

तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांची आकलनशक्ती, बौद्धिक क्षमता विलक्षण असते. त्यामुळे या वयातील मुलांच्या क्षमतांना अधिक वाव मिळावा असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे."


शालेय शिक्षणात येणार क्रेडिट सिस्टीम

शिक्षणातील विद्यार्थ्यांचा 'लर्निंग आउटकम' या पुढील काळात नोंदविला जाणार आहे. शैक्षणिक 'क्रेडिट'बरोबरच कला, क्रीडा, कार्यानुभव याअंतर्गत मिळालेल्या 'क्रेडिट'ला महत्त्व असेल, असेही गोसावी यांनी आवर्जून नमूद केले.


Post a Comment

0 Comments

close