Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'जीवन शिक्षण' मासिकासाठी साहित्य किंवा लेख पाठविणेबाबत परिपत्रक व पत्ता / ईमेल jeevanshikshan@maa.ac.in

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे-३०. यांच्या मार्फत जीवन शिक्षण हे मासिक दरमहा प्रकाशित केले जाते, या मासिकाला १५० वर्षाहून अधिक वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावणारे हे मासिक शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र म्हणून वितरीत करण्यात येते. यासाठी 'जीवन शिक्षण' मासिकाच्या पुनर्रचनेनुसार साहित्य पाठविण्यास सर्व शिक्षक, अधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे. 'जीवन शिक्षण' मासिकासाठी साहित्य किंवा लेख पाठविणेबाबत परिपत्रक व पत्ता / ईमेल jeevanshikshan@maa.ac.in


जीवन शिक्षण मासिकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वदूर प्राथमिक शाळांतील शिक्षण विषयक नवे विचार, नव्या जाणिवा, शैक्षणिक संशोधन व नवीन शैक्षणिक तंत्रे शिक्षकांपर्यंत पोहचविले जातात. शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापनातील गरजा व अडचणी विचारात घेवून वेळोवेळी नवीन अभ्यासक्रमसंदर्भात तज्ज्ञांचे लेख, शिक्षण विषयक विचार आणि मार्गदर्शन शिक्षकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले जाते.


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विषयीची माहिती, शिक्षकांची प्रज्ञा, प्रतिभा यांच्या संपूर्ण विकासासाठी विविध लेख, मुलाखती, अनुभव आदी अंतर्भूत करण्यात आलेले असतात विद्याध्योच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रभक्ती या मूल्यांच्या संस्कारासाठी सोप्या सुगम भाषेत लेख दिलेले असतात. शिक्षण क्षेत्रातील नवोपक्रम, प्रकल्प, नवसंशोधन, शिक्षण क्षेत्रातील घडामोडी अशा लेखांचा अंतर्भात असतो. शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना यांचा अंतर्भाव असतो. शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, अधिकारी, संस्था अदययावत राहण्यासाठी या अंकातील ज्ञान, माहिती अत्यंत उपयुक्त असते. ज्यामुळे शिक्षकांची, शाळांची गुणवत्ता वृध्दिगत होण्यास मदत होते.


तरी आपल्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विषय साधनव्यक्ती, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अध्यापक विदयालयातील अध्यापकाचार्य, छात्राध्यापक इत्यादीनी खाली दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे जीवन शिक्षण मासिकासाठी लेख/साहित्य पाठविण्याबाबत आपणामार्फत कळविण्यात यावे. 


• संशोधनात्मक लेख यामध्ये संशोधन उद्दिष्टे, कार्यवाही, फलनिष्पती, निष्कर्षाचे सार्वत्रिकीकरण व आवश्यक पुरावे असणारे लेख.

नवोपक्रम : अधिकारी, शिक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात राबविलेले नवोपक्रम याविषयी नवोपक्रमाची उद्दिष्टे, कार्यवाही, फलनिष्पती, आवश्यक पुरावे यानुसार मद्देसूद मांडणी असणारे लेख.

• स्थानिक शिक्षण तज्ज्ञ, अभ्यासक यांचे शिक्षणविषयक लेख पाठविण्याबाबत प्रोत्साहन द्यावे.

• ज्या शिक्षकांची मागील २ महिन्यात शैक्षणिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी दोन प्रतीत पुस्तके व त्यांचा सारांश पाठविण्याचे आवाहन करण्यात यावे. जीवन शिक्षण अंकात प्रत्येक महिन्यात उचित निकषानसार पुस्तकांचा सारांश व संबंधित लेखकांची माहिती प्रकाशित करण्यात येणार आहे.

• Ph.D व इतर राज्य, राष्ट्रीय पुरस्कार यांची माहिती व पुरावे घेऊन अशा अधिकारी, शिक्षक यांची माहिती जीवन शिक्षण मासिकात प्रसिध्दी करण्याबाबत पाठविण्यात यावी.

• अधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी वैशिष्ट्यपूर्ण शाळा, संस्था यांना दिलेल्या भेटी व त्यावर आधारित लेख.

• आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकारी, शिक्षक यांचे पुस्तक परीक्षण (Book Review) मागील दोन महिन्यात प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर आधारीत (नवीन पुस्तके) परीक्षणात्मक तथा पुस्तकांचे वाचन करून संबंधितांनी लिहिलेले लेख.


वरीलप्रमाणे उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण लेखन असणाऱ्या लेखांनाच 'जीवन शिक्षण' मासिकामधून प्रसिध्दी देण्यात येईल.


साहित्य किंवा लेख पाठविण्यासाठीचा पत्ता : 
संपादक, जीवन शिक्षण
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे
७०८, सदाशिवपेठ, कुमठेकर रोड, पुणे-४११०३०
ई-मेल jeevanshikshan@maa.ac.in


(ज्योती शिंदे)

उपसंचालक,

आय.टी व प्रसारमाध्यम विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


'जीवन शिक्षण' मासिकाच्या पुनर्रचनेनुसार सर्व शिक्षक, अधिकारी यांनी साहित्य व लेख पाठविणेबाबत शासन परिपत्रक - Click Here

Post a Comment

0 Comments

close