Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हॅकॅथॉन उपक्रम - स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon उपक्रम विद्यार्थी नोंदणी लिंक | शासन परिपत्रक

हॅकॅथॉन उपक्रम - STARS प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमाचे इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात येत आहे.  स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमात इयत्ता ६ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना लिंकद्वारे सहभागी होण्यासाठी सूचित करण्याबाबत परिपत्रक, सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक PDF / video


Hackathon उपक्रमाचा उद्देश

विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी २१ व्या शतकातील कौशल्याची रुजवणूक व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Hackathon या उपक्रमांतर्गत NEP २०२०, NCF २०२३, UN SDG यानुसार १५ विषयांतर्गत (Themes) विद्यार्थ्यांनी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. 

Hackathon या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. 


यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्यासाठी दिनांक ०६/०९/२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता झूम प्लॅटफॉर्मद्वारे शिक्षण क्षेत्रातील जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना सदर उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तसेच सदर उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी व हॅकेथोन उपक्रमासंदर्भात सक्षमपणे कार्यवाही करण्यासाठी राज्य स्तरावर दिनांक २५ व २६ सप्टेबर २०२४ या कालावधीत तज्ञ मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता / वरिष्ठ अधिव्याख्याता नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहेत.


सदर उपक्रमात आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी या उपक्रमातील विषयांतर्गत प्रतिकृती अथवा मॉडेल तयार करून सहभागी व्हायचे आहे. यासाठी प्रस्तुत परिषदेमार्फत https://maa.ac.in/SCERTMahaHackathon नोंदणी लिंक देण्यात येत आहे. सदर लिंक परिषदेच्या साईट वर अपलोड करण्यात आली आहे.  सदर नोंदणी शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे. सहभागी होण्याबाबत सगळ्या सूचना लिंकवर देण्यात आल्या आहेत. 

यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून किमान १००० नोंदणी होणे अपेक्षित आहे. यास्तव आपल्या जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानित व शासकीय शाळेतील सर्व इयत्ता ६ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमाबाबत अवगत करून मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे सदर उपक्रमासंदर्भात काही शंका असल्यास जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी आपल्या स्तरावर प्रसिद्धी देण्यात यावी.


Hackathon Registration Link - https://maa.ac.in/SCERTMahaHackathon

Hackathon उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी लिंक - Click Here


Hackathon उपक्रमात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सूचना video - Click Here

स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमात इयत्ता ६ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना लिंकद्वारे सहभागी होणेबाबत परिपत्रक - Click Here


Post a Comment

0 Comments

close