हॅकॅथॉन उपक्रम - STARS प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमाचे इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात येत आहे. स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमात इयत्ता ६ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना लिंकद्वारे सहभागी होण्यासाठी सूचित करण्याबाबत परिपत्रक, सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक PDF / video
हॅकॅथॉन म्हणजे काय?
हॅकॅथॉन हा ठरावीक कालावधीत राबविला जाणारा वैयक्तिक किंवा गटात करता येणारा उपक्रम आहे. यामध्ये विद्यार्थी सहकार्याने विचार करून एखाद्या समस्येवर नाविन्यपूर्ण, व्यवहार्य आणि कमी खर्चिक उपाय शोधतात व त्याचे सादरीकरण करतात.
Hackathon उपक्रमाचा उद्देश
विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी २१ व्या शतकातील कौशल्याची रुजवणूक व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
i) विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक परिसरातील समस्या प्रत्यक्ष सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्याची संधी देणे.
ii) दर्जेदार उपाययोजना विकसीत करत संवाद कौशल्य (Communication), माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्य (ICT), हरित कौशल्य (Green) या कौशल्यांच्या विकासासाठी विद्यार्थ्यांना संधी निर्माण करुण देणे.
iii) विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता हे कौशल्य विकसित करण्याकरीता नवनिर्मितीची संधी देणे.
Hackathon या उपक्रमांतर्गत NEP २०२०, NCF २०२३, UN SDG यानुसार १५ विषयांतर्गत (Themes) विद्यार्थ्यांनी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे.
Hackathon या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे.
यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्यासाठी झूम प्लॅटफॉर्मद्वारे शिक्षण क्षेत्रातील जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना सदर उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तसेच सदर उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी व हॅकेथोन उपक्रमासंदर्भात सक्षमपणे कार्यवाही करण्यासाठी राज्य स्तरावर तज्ञ मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता / वरिष्ठ अधिव्याख्याता नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहेत.
सदर उपक्रमात आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी या उपक्रमातील विषयांतर्गत प्रतिकृती अथवा मॉडेल तयार करून सहभागी व्हायचे आहे. यासाठी प्रस्तुत परिषदेमार्फत नोंदणी लिंक देण्यात येत आहे. सदर नोंदणी शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे. सहभागी होण्याबाबत सगळ्या सूचना लिंकवर देण्यात आल्या आहेत.
यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून किमान १००० नोंदणी होणे अपेक्षित आहे. यास्तव आपल्या जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानित व शासकीय शाळेतील सर्व इयत्ता ६ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमाबाबत अवगत करून मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे सदर उपक्रमासंदर्भात काही शंका असल्यास जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी आपल्या स्तरावर प्रसिद्धी देण्यात यावी.





0 Comments