Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 तारखांची घोषणा, एकाच टप्प्यात होणार मतदान, आचारसंहिता सुरु

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.



मतदान यंत्र ( कंट्रोल युनिट ) कसे सील करावे? Step by Step Guide

ABCD पट्टीसील कशी लावावी? Step by Step Guide

निवडणूक संबंधी सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी येथे टच करा. Click Here


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 तारखांची घोषणा 

Maharashtra Assembly Election 2024 Date Announce

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.




भारतीय निवडणूक आयोग वेबसाइट
https://eci.gov.in/

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग वेबसाइट
https://ceo.maharashtra.gov.in/Election.aspx


महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुकांची घोषणा केली जात नाही. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा होणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम कसा असणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 दाखल करू शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 04 नोव्हेंबर पर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकणार आहेत. मतदान 20 नोव्हेंबर रोजी होईल तर निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल. 


Share it

Post a Comment

0 Comments

close