मतदान सुरु करण्यापूर्वी मतदान यंत्र तयार करुन ठेवावे लागते. मतदान यंत्र सील कसे करावे? याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
मतदान यंत्र ( कंट्रोल युनिट) सील करण्याकरिता सुरुवात करण्यापूर्वी ते पाठीमागील बटणावरुन ऑफ ( बंद ) करणे आवश्यक आहे. मतदान यंत्र स्वीच ऑफ केल्यानंतर सीलींग करण्यास सुरुवात करावी व सील पूर्ण झाल्याशिवाय मतदान यंत्र सुरु करु नये.
कंट्रोल युनिट सील करण्यासाठी निवडणूक आयोगाने विहित केलेले पेपर सील वापरुन ते सीलबंद करावयाचे आहे. त्यासाठीच्या स्टेप्स पाहूया.
Step 1 - कंट्रोल युनिटचा रिझल्ट सेक्शन उघडा. त्याच्या आतल्या कप्प्याच्या झाकणाच्या आतल्या बाजूस पेपर सील (कागदी मोहोर ) घालण्यासाठी एक चौकट ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये पेपर सील अशी घाला की त्या पेपर सील चा अनुक्रमांक पेपर सील दुमडल्यानंतर वरील बाजूस येईल.
फोटो पहा.
वर नमूद केल्याप्रमाणे पेपर सील आपल्या जागी घट्ट बसून राहावे व ते आपल्या जागेवरुन हालू नये यासाठी आवश्यक असल्यास एका पातळ पुठ्ठ्याचा आधार पेपरसीलला देता येईल. पेपरसील आपल्या जागेवरुन हलणार नाही याची खात्री करण्यासाठी ते एका बाजूने हळूच ओढून ते घट्ट बसल्याची खात्री करावी. तथापी ते सील खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी. खराब झाल्यास त्वरित दुसरे पेपर सील वापरण्यात यावे.
Step 2 - पेपर सील (कागदी मोहोर) घट्ट बसविल्यानंतर कंट्रोल युनिटच्या आतल्या कप्प्याचे झाकण घट्ट दाबून बंद करावे. सदर झाकण अशा रितीने बंद करावे की पेपरसीलच्या दोन्ही बाजूंची टोके आतल्या कप्प्याच्या बाहेर येतील.
Step 3 - पेपरसील घट्ट बसविल्यानंतर व आतल्या कप्प्याचे झाकण घट्ट दाबून बंद केल्यानंतर आतल्या झाकणाच्या डाव्या बाजूस स्पेशल टॅग लावून सील करावा. त्यासाठी डाव्या बाजूस ठेवण्यात आलेल्या दोन छिद्रांमधून एक दोरा ओवून त्याला दोन गाठी माराव्यात. त्यानंतर थोड्या अंतरावर एक स्पेश गाठ मारावी. त्यानंतर स्पेशल टॅग लावून एक गाठ मारुन स्पेशल टॅग सीलबंद करावा. सीलबंद केल्यानंतर स्पेशल टॅग दिलेल्या जागेत सावकाश ठेवावे. त्याचा धक्का Close बटणाला लागणार नाही याची दक्षता घ्यावी.

Step 4 - स्पेशल टॅग सीलबंद केल्यानंतर रिझल्ट सेक्शन च्या वरील झाकण बंद करावे. झाकण बंद करताना पेपरसीलची दोन्ही टोके बाजूला राहतील याची काळजी घ्यावी.
Step 5 - रिझल्ट सेक्शन चे वरील झाकण बंद केल्यानंतर पत्त्याची खूणचिट्टी ( address tag ) वापरुन रिझल्ट सेक्शन चे वरील झाकण सीलबंद करावे. वरील झाकण लावल्यानंतर त्या झाकणाच्या डाव्या बाजूस असणाऱ्या दोन छिद्रांमधून दोरा ओवून त्याला दोन गाठी माराव्यात. त्यानंतर एक स्पेस गाठ मारुन खूणचिट्टी (address tag) लावून सीलबंद करावे. ही खूणचिट्टी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर पत्त्याची खूणचिट्टी वर बांधलेली असेल त्याच धर्तीवर ही खूणचिट्टी असेल.
Step 6 - ABCD पट्टीसील वापरुन मतदान यंत्र पूर्णतः सीलबंद करणे. ABCD पट्टीसील द्वारे मतदान यंत्र कसे सील करावे. step by step माहिती पहा.
ABCD पट्टटीसील टप्पा क्र.१ - रिझल्ट सेक्शन च्या कप्प्याच्या खालील बाजूने पेपरसील ची जी दोन टोके वरती येतात, त्यापैकी खालील टोकाचा भाग अशा प्रकारे मध्यभागी दुमडावा की पेपरसीलचा गुलाबी भाग वरती दिसेल.
ABCD पट्टटीसील टप्पा क्र. २ - त्यानंतर ABCD अक्षरे असलेली पट्टी सील वापरुन कंट्रोल युनिट सील करावे. असे करताना A भाग पेपरसीलच्या खालील बाजूस ठेवून A वरील मेणकागद काढून पेपरसील त्यावर चिटकवावी.
ABCD पट्टटीसील टप्पा क्र. ३ - पेपरसील A भागाला चिटकविल्यानंतर पट्टी सील चा B भाग दुमडून पेपरसीलच्या गुलाबी रंग असणाऱ्या बाहेरील बाजूस मेणकागद काढून चिटकवावा.
ABCD पट्टटीसील टप्पा क्र. ४ - पट्टीसीलचा B भाग चिटकविल्यानंतर वरती मेणकागद लावलेला C भाग येतो. त्या C भागावरील मेणकागद काढून पेपरसीलचे वरील टोक त्या C भागावर चिटकवावे.
ABCD पट्टटीसील टप्पा क्र. ५ - त्यानंतर पट्टीसील डाव्या बाजूने मतदान यंत्राभोवती गोल फिरवून पट्टीसीलचा D भाग जेथे A,B,C भाग चिकटविलेले आहेत, त्याठिकाणी सरळ आणून पेपर सील (कागदी मोहोर) च्या वरील टोकावर चिटकवावा.
पट्टीसील यंत्राभोवती गोल फिरवताना क्लोज बटणाच्या वर जाणार नाही याची काळजी घ्यावी. पट्टीसील क्लोज बटणाच्या खालील बाजूने घ्यावी. म्हणजे मतदान यंत्र क्लोज करताना पट्टीसीलचा अडथळा येणार नाही.
अशाप्रकारे तुमचे मतदान यंत्र (कंट्रोल युनिट) सील बंद करुन होईल. सीलबंद झाल्यानंतर तुमचे मतदान यंत्र पाठीमागील ऑफ केलेले बटण ऑन करा. आता तुमचे मतदान यंत्र मतदान सुरु करण्यास तयार झालेले आहे.
0 Comments