Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळा प्रवेशोत्सव 2024-25 | शाळांमध्ये प्रथम दिवशी विविध उपक्रमाचे आयोजन

विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सुकतने होणेसाठी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता १ली ते १२वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 शाळा सुरु करणेबाबत शासन निर्णय पहा. - Click Here

शाळा प्रवेशोत्सव आयोजनाबाबत परिपत्रक - Click Here

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजनाबाबत सूचना

१. शाळेच्या परिसरातील (वयोगट ६ ते १४ वर्ष) वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात यावी. 

२. शाळाबाह्य झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळापूर्व तयारीच्या कालावधीमध्ये करण्यात यावा, निर्देशनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावेत. 

३. नजिकच्या परिसरातील दगडखानी, बोटभट्टी, बांधकामाचे स्थळ, उद्याने, बाजार पेठा, पदपथ, सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या या सारख्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे. 

४. शाळा प्रवेशाचा पहिल्या दिवशी आपण व आपल्या अधिनस्त प्रत्येक अधिकाऱ्यांनी व्यक्तीश: किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे / शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन / प्रबोधन करावे.

५. विद्यार्थ्यांचे स्वागत फुल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य, स्थानिक स्त्रोत मध्ये उपलब्ध उपयोगी सामुग्री देऊन करण्यात यावे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण करण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक इ.चे व्यवस्थापन करण्यास मार्गदर्शन करावे. 

६. मागील दोन वर्षांत विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसल्याने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व शिक्षक यांचेशी विचार विमर्श करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतु अभ्यासक्रम, इतर विविध शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्बोधन व सहकार्य करावे.

७. शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाची स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी.

८. शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, इ. यांचे सहकार्य घेण्यात यावे.

शाळापूर्व तयारी अभियान 2024-25 मेळावा क्रमांक 2 तयारी कशी करावी? मेळावा तयारीसाठी महत्त्वपूर्ण PDF पहा. - Click Here

शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी कोणते उपक्रम आयोजित करावेत? 


नव्या शैक्षणिक वर्षात शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करावा, या सरकारी आदेशानुसार (१५ जून २०२3) राज्यभरात शाळा प्रवेशोत्सव होणार आहे. यासाठी बहुतांश शाळा हारतुरे, फुगे, फुले आदी सजावटीद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

शाळेचा उंबरठा पहिल्यांदाच ओलांडणाऱ्या मुलांना शाळा हवीहवीशी वाटावी, यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. प्रभातफेरी, विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वितरण तसेच माध्यान्ह भोजनातील जेवणात गोड पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. स्थानिक कलाकार अथवा आजी-माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

शाळापूर्व तयारी अभियान 2024-25 मेळावा क्रमांक 2 तयारी कशी करावी? मेळावा तयारीसाठी महत्त्वपूर्ण PDF पहा. - Click Here


Post a Comment

0 Comments

close