NCERT व SCERT यांच्या संयुक्त विद्यमाने रंगोत्सव आणि समृध्दी कार्यक्रम 2024-25 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
NCERT व SCERT यांच्या संयुक्त विद्यमाने रंगोत्सव आणि समृध्दी कार्यक्रम 2024-25 अंतर्गत 11 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 रोजी SCERT येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्राथमिक शिक्षक यांचेसाठी रंगोत्सव आणि माध्यमिक शिक्षक यांचेसाठी हा समृध्दी आहे.
प्राथमिक शिक्षकांसाठी - रंगोत्सव अंतर्गत 2 प्राथमिक शिक्षक ( इयत्ता 3 री ते 8 वी) यांनी Art integrated pedagogy, sport integrated pedagogy, toy based pedagogy, story telling या पैकी एका विषयावर अध्ययन अध्यापन Video बनवून त्याची ड्राईव्ह लिंक खाली दिलेल्या लिंकवर पेस्ट करायची आहे.
रंगोत्सव कार्यक्रम लिंक
https://forms.gle/nPiyWRFzD1sBKpWR8
माध्यमिक शिक्षकांसाठी - समृध्दी कार्यक्रम अंतर्गत 2 माध्यमिक शिक्षक ( इयत्ता 9 वी ते 12 वी) यांनी Art integrated pedagogy या विषयावर अध्ययन अध्यापन Video बनवून त्याची ड्राईव्ह लिंक खाली दिलेल्या लिंकवर पेस्ट करायची आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत 1 विषय शिक्षक व 1 शिक्षक विविध कलांचे अध्यापन करणारे असावेत.
समृद्धी कार्यक्रम लिंक
https://forms.gle/BLXY23hUQW3uirNQ8
सद्यस्थितीत रंगोत्सव कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षक यांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र समृध्दी कार्यक्रमासाठी माध्यमिक शिक्षक यांचा अत्यल्प प्रतिसाद आहे. तदनुषंगाने कृपया जास्तीत जास्त शिक्षक यांनी यात सहभाग घ्यावा, यासाठी आपले स्तरावरून सूचित करण्यात यावे. दोन्ही स्पर्धेत video लिंक अपलोड करायची अंतिम मुदत 29 डिसेंबर 2025 ही आहे. या दोन्ही कार्यक्रम संदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जावून you tube वरील Video पाहावे , हे सुध्दा सूचित करण्यात यावे.
रंगोत्सव आणि समृध्दी कार्यक्रम 2024-25 बाबत You tube लिंक
https://www.youtube.com/live/mA8yZI3X1cE?si=t_rb78jPJ5Ayehi7
रंगोत्सव आणि समृध्दी कार्यक्रम 2024-25 शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे
0 Comments