महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024 रोजी दोन सत्रात आयोजित करण्यात आली. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे उपलब्ध करून दिल्या आहेत.
मागील काही महिन्यांपासून या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आले होते. यात कृषी पदवीधर असणाऱ्या तरुणांच्याही जागांचा समावेश करावा, यासाठी स्पर्धा परीक्षार्थीनी वारंवार आंदोलनही केले आहे. त्यानुसार ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबर 2024 रोजी ही परीक्षा घेण्यात येत आहे.
'एमपीएससी'तर्फे नागरी सेवा परीक्षेच्या रचनेत बदल केला गेला. २०२५ च्या परीक्षेपासून हा बदल लागू करण्याची घोषणा केली होती. परीक्षेचा निकाल पुढील वर्षी मार्चपर्यंत जाहीर होईल. यानंतर एप्रिलमध्ये मुख्य परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर सप्टेंबरमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून मुख्य परीक्षेला पात्र उमेदवारांना वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेला सामोरे जावे लागेल.
0 Comments