Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळा स्तरावरील विविध समित्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट होणार

शाळा स्तरावरील विविध 15 समित्यांपैकी काही समित्यांचे कामकाज आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे असलेले कामकाज यांच्यात समानता आढळून येत असल्याचे निदर्शनास येत आहे. याशिवाय संदर्भीय समित्यामध्ये काही ठिकाणी पदांची व त्यामध्ये असलेल्या कार्याची द्विरुक्ती होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शाळा स्तरावरील विविध समित्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला आहे. 

शाळा स्तरावरील विविध समित्यांची रचना व कार्ये - Click Here


शाळा व्यवस्थापन समिती SMC रचना व कार्ये पहा. - Click Here

शालेय शिक्षण विभाग व इतर शासकीय विभागांनी वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रके व अधिसूचनांव्दारे शालेय कामकाजासंदर्भात विविध समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय, परिपत्रके व अधिसूचनामधील नमूद सर्व समित्यांचे कामकाज शाळा स्तरावर सुरु आहे. यानुसार सदयस्थितीत शाळास्तरावर विविध 15 समित्या स्थापन झालेल्या आहेत.


सदर 15 समित्यांपैकी काही समित्यांचे कामकाज आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे असलेले कामकाज यांच्यात समानता आढळून येत असल्याचे निदर्शनास येत आहे. याशिवाय संदर्भीय समित्यामध्ये काही ठिकाणी पदांची व त्यामध्ये असलेल्या कार्याची द्विरुक्ती होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच काही समित्यांचे कामकाज शाळा व्यवस्थापन समितीद्वारे करण्यात यावे असेही निर्देश आहेत. जसे शालेय पोषण आहार योजना, नवभारत साक्षरता समिती इत्यादी. वरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या कमी केल्यास मुख्याध्यापक व शिक्षकांना अध्ययन/अध्यापनासाठी व शालेय कामकाजासाठी अधिकचा वेळ उपलब्ध होऊ शकणार आहे. याकरीता समित्यांचे एकत्रीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय - 

यापुढे शाळा स्तरावर खालील चार समित्याच राहतील. महिला तक्रार निवारण समिती ही एका कार्यालयात 10 पेक्षा जास्त महिला असल्यासच स्थापन करता येते. त्यामुळे बहुतेक शाळेत शाळास्तरावर तीनच समित्या राहणार आहेत. 

शाळा व्यवस्थापन समिती

सखी सावित्री समिती

महिला तक्रार निवारण समिती / अंतर्गत तक्रार समिती

विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती



शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत शासन निर्णय 16 एप्रिल 2025 डाउनलोड करा. - Click Here



शासनाने शाळास्तरावरील विविध समित्या ह्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट करुन बळकटीकरण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यासाठी मुख्याध्यापक/शिक्षक आणि क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी विचारविमर्श करुन विविध समित्यांचे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ठ करण्याच्या दृष्टीने प्रारुप तयार करण्यात आलेले आहे.


विविध समित्या ह्या शाळा समितीमध्ये समाविष्ट करावयाच्या दृष्टीने शिक्षण संचालक कार्यालयाने प्रारुप तयार केले असल्याने याबाबत अंतिम स्वरुप देण्यासाठी दिनांक २०.०२.२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता प्रस्तुत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रारुप अंतिम करण्यासाठी या बैठकीस सोबत असलेल्या कर्मचारी/अधिकारी यांनी उपस्थित रहाणे आवश्यक आहे.


तरी आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना सदर बैठकीस उपस्थित रहाण्यासाठी कार्यमुक्त करावे. जेणेकरुन प्रारुप अंतिम करण्यात येऊन शासनास सत्वर सादर करणे शक्य होईल.

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

Post a Comment

0 Comments

close