Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासन निर्णय - शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाच्या कमाल मर्यादेत वाढ करणेबाबत

जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाच्या कमाल मर्यादेत वाढ करण्यात येत आहे. 


राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कुटुंब निवृत्तीवेतन/ सेवा उपदान लागू करणेबाबत शासन निर्णय - Click Here



निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतनाच्या मूळ वेतनात 100% पर्यंत वाढ करणेबाबत शासन निर्णय - Click Here

शासन निर्णय 10.10.2024 अन्वये वित्त विभागाने केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लाखावरुन रु.२० लाख करण्यााबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयाच्या परिच्छेद क्र.२ मध्ये "ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदाप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषित्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषि विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील." असे स्पष्ट केले आहे. वित्त विभागाच्या सदर आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा १४ लक्ष वरुन २० लक्ष करण्याची बाब शासन विचाराधीन होती.


शासन निर्णय

वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक १०/१०/२०२४ अन्वये केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लाखावरुन रु.२० लाख करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतूदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दि.०१/०९/२०२४ पासून सेवानिवृत्ती उपदान /मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा १४ लक्ष वरुन २० लक्ष अशी वाढविण्यात येत असल्याचे याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे.

यानुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील. सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उचित कार्यवाही करावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०३१११५३१५५६८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


शासन निर्णय 11 मार्च 2025 - शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाच्या कमाल मर्यादेत वाढ करणेबाबत शासन निर्णय डाउनलोड करा. - Click Here

Post a Comment

1 Comments

  1. अंशतः अनुदानित शिक्षकांना निवृत्तीनंतर कोणता तरी लाभ मिळणार की नाही?

    ReplyDelete

close