देशभक्तीपर गीतांवर आधारित सामुहिक कवायत संचलन | कवायत संचलन मार्गदर्शक नमूना Video | परिपत्रक | माहिती अपलोड करण्यासाठी लिंक
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये दिनांक २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध (प्रभात फेरी, भाषण/निबंध/कविता स्पर्धा, खेळ, प्रदर्शनी) उपक्रमांसह साजरा करणेबाबत शासन परिपत्रक दि. ३१ डिसेंबर, २०२४ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या सर्व शाळांमध्ये मागील शैक्षणिक वर्षामध्ये दि. १५ ऑगस्ट, २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने तसेच दि. २६ जानेवारी, २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशभक्तीपर गीतांवर कवायत संचलन कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले.
यावर्षीही आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने दि. १५ ऑगस्ट, २०२६ रोजी सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनी शासकीय झेंडावंदन कार्यक्रमानंतर साधारणतः २० मिनिटांचा सामुहिक कवायत संचलन कार्यक्रमआयोजित करण्यात यावा. यासाठी आवश्यक मार्गदर्शक व्हिडिओची लिंक सोबत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शाळास्तरावर कवायत संचलन कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ बाबतची माहिती भरण्यासाठी सुविधा शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील स्कूल पोर्टलमध्ये मुख्याध्यापकांच्या लॉगिन वर उपलब्ध करून दिली जाईल.
कवायत संचलन कार्यक्रम फोटो व व्हिडिओ सरल पोर्टल वर अपलोड करणेबाबत लिंक - Click Here
सामुहिक कवायत संचलन मार्गदर्शन व्हिडीओची लिंक
https://drive.google.com/file/d/1tm07J3xE39XT-18uyWuKILT51WrMTRZY/view




0 Comments