Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळांची नोंदणी करणे अनिवार्य | शासन निर्णय पहा. | शाळांची नोंदणी करण्यासाठी लिंक - education.maharashtra.gov.in

पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळांची नोंदणी करणे अनिवार्य | वर्षे ३ ते ६ या वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांच्या नोंदणी अनिवार्य करणेबाबत शासन निर्णय | शाळांची नोंदणी करण्यासाठी लिंक - education.maharashtra.gov.in




राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अनुसार ५+२+३+४ आकृतीबंधातील पहिली ५ वर्षे म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेची ३ वर्षे (वयोगट ३ ते ६) व इयत्ता १ ली आणि इयत्ता २ री (वयोगट ६ ते ८) यांचा समावेश आहे. या ५ वर्षाच्या टप्प्याला 'पायाभूत स्तर' असे संबोधण्यात आले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूतस्तर (National Curriculum Framework Foundation Stage -NCFFS) केंद्र शासनाने तयार केला असून त्यावर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर (State Curriculum Framework Foundation Stage SCFFS) राज्याने तयार केला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 PDF सर्व भाषेमधून डाउनलोड करा. - Click Here


राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पुढील ध्येय स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. "वय वर्ष ३ ते ८ वयोगटातील प्रत्येक बालकाला लवकरात लवकर मोफत, सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि वैकल्पिकदृष्ट्या सुयोग्य वातावरण मिळवून देणारे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण सहज उपलब्ध करुन देणे."

राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024  (SCF SE 2024) PDF डाउनलोड करा.


सद्यस्थितीत वय वर्ष ३ ते ६ वयोगटातील बालकांना अंगणवाड्या, बालवाड्या, शाळेला जोडून पूर्व प्राथमिक वर्ग व खाजगी पूर्व प्राथमिक वर्ग यामधून शिक्षण दिले जाते. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या व अंगणवाड्या यांची नोंदणी व माहिती महिला व बाल विकास विभाग यांचेकडे उपलब्ध आहे. तथापि खाजगी पूर्व प्राथमिक वर्गाची अधिकृत माहिती सद्यःस्थितीमध्ये शासनाकडे उपलब्ध नाही. वयोगट ३ ते ६ साठी पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी केंद्रांची माहिती एकत्रित स्वरुपात राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर तसेच पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे. 


यासाठी वयोगट ३ ते ६ यांना शिक्षण देणारे केंद्र Pre. School, Nursery, Jr. K.G.. Sr. K. G., पूर्व प्राथमिक वर्ग अशा कोणत्याही नावाने सुरु असलेल्या, वयोगट ३ ते ६ मधील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांची नोंदणी करण्यासाठी Pre School Registration पोर्टल शासनाकडून सुरु करण्यात आले आहे. यामध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणा-या खाजगी केंद्रांची सर्वसाधारण माहिती, व्यवस्थापनाची माहिती, विद्यार्थी संख्या, भौतिक सुविधा, कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माहिती यांची नोंद पोर्टलवर करावयाची आहे.


पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांच्या नोंदणीची सुविधा education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Web Links मध्ये उपलब्ध असलेल्या Pre-School Registration Portal (ECCE) या टॅबवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यामुळे ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांनी या पोर्टलवर पुढील सात दिवसांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येत आहे,


खाजगी पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी करण्यासाठी लिंक

education.maharashtra.gov.in


Here's a direct link to register Pre Primary School

https://education.maharashtra.gov.in/school/users/preSchoolsLanding


पूर्व प्राथमिक शाळांना अभ्यासक्रम व पाठ्यक्रम लागू करणेबाबत शासन निर्णय पहा. Click Here


शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी यासंदर्भातील कार्यपूर्ती अहवाल शासनास सादर करावा.


सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२५०४२४११२९१९४२२१ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


खाजगी पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना नोंदणी करणे अनिवार्य | शासन निर्णय डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close