Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

MH CETs Exam 2026 Schedule | राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी- 2026 ऑनलाईन प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या एमएच-सीईटी- 2026 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. MH CET Exam 2026 Schedule


राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) आगामी 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी सामायिक प्रवेश परीक्षांचे (सीईटी परीक्षा) संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना 24 मार्चपासून सुरुवात होणार आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी शाखेची सीईटी परीक्षा 11 एप्रिल ते 26 एप्रिलदरम्यान घेण्याचे सीईटी सेलने प्रस्तावित केले आहे.


राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून दरवर्षी घेतली जाते. विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांचे वेळापत्रक माहीत झाल्यास त्यानुसार या परीक्षांची तयारी करणे शक्य व्हावे यादृष्टीने तीन महिन्यांपूर्वीच प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे.


सीईटी सेलने 20 परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्यानुसार यंदा सीईटी सेलकडून एमएड आणि एमपीएड अभ्यासक्रमांची परीक्षा 24 मार्चला घेतली जाणार आहे. सीईटी सेलकडून पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी परीक्षा 21 एप्रिल ते 26 एप्रिलदरम्यान आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा 11 एप्रिल ते 19 एप्रिलदरम्यान घेतली जाणार आहे, तर एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा 06 एप्रिल ते 08 एप्रिल दरम्यान घेण्याचे प्रस्तावित केले आहे.



विविध सीईटी परीक्षा 2026 व संभाव्य तारखा


इंजिनिअरिंग, कृषी, फार्मसी  - 11 एप्रिल ते 26 एप्रिल

एलएलबी ३ वर्ष - 01 एप्रिल ते 02 एप्रिल

एमबीए, एमएमएस - 06 एप्रिल ते 08 एप्रिल

एमसीए - 30 मार्च

बी. डिझाइन - 05 एप्रिल

बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस - 28 एप्रिल ते 30 एप्रिल

एलएलबी ५ वर्ष - 8 मे

एएसी फाइन आर्ट - 10 एप्रिल

बीएससी नर्सिंग - 6 मे ते 7 मे

डीपीएन, पीएचएन - 5 मे


STATE COMMON ENTRANCE TEST CELL, MUMBAI

Tentative Schedule of CET 2026




Join WhatsApp

https://chat.whatsapp.com/FiYXPh4RiZnFm3v6RLV3sR

अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांचे माहिती पुस्तिका, वेळापत्रक आणि अभ्यासक्रम राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर https://cetcell.mahacet.org/ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उच्च शिक्षण विभागाचे विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षाचे ऑनलाईन अर्ज cet cell च्या अधिकृत संकेतस्थळावरुन भरता येतील. 

Post a Comment

0 Comments

close