SCF SE 2025 - राज्य अभ्यासक्रम आराखडा 2025 SCERT Maharashtra | State Curriculum Framework (SCF SE 2025) feedback link
July 28, 2025
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP2020 ची अंमलबजावणीच्या दृष्टीने SCERT, Maharashtra ने राज्य अभ्यासक्रम आराखडा 2025 State Curriculum Framework (SCF 2025)(पायाभूत स्तर) चा मसुदा तयार केलेला आहे. सदर आराखडा https://www.maa.ac.in येथे उपलब्ध केला आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा 2025 ला मंजुरी देण्यात आली आहे. SCF SE 2025 - राज्य अभ्यासक्रम आराखडा 2025 SCERT Maharashtra | State Curriculum Framework (SCF SE 2025) feedback link
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार इ.३री ते १०वी (वयोगट ०८ ते १४ वर्षे) साठी शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा २०२५ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे. सदर मसुद्यावर जनतेच्या सूचना व अभिप्राय मागविण्यात येत आहेत.
सदर मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक. २८/०७/२०२५ पासून सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येत आहे. सदर शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा २०२५बाबत आपले अभिप्राय दिनांक. २७/०८/२०२५ पर्यंत खालील लिंक मध्ये ऑनलाईन नोंदवावेत असे आवाहन सर्व शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक, अभ्यासक, पालक, अधिकारी, संघटना व समस्त समाज घटकांना करण्यात येत आहे.
अभिप्राय नोंदविताना अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण असाव्यात ज्यामध्ये विषय, इयत्ता, स्तर, संबंधित पृष्ठ क्रमांक, मूळ मसूद्यातील मजकूर, अपेक्षित बदल / दुरुस्ती, बदलाचे कारण, सुधारित मजकूर कसा असावा, यांचा समावेश असावा तसेच त्यामध्ये आपले नाव, दूरध्वनी, इ-मेल, पत्ता इत्यादी तपशील देण्यात यावा अशी विनंती.
टीपः अभिप्राय पोस्टाने पाठवायचे असल्यास त्यावर शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा- २०२५ बाबत अभिप्राय (अभ्यासक्रम विकसन विभागासाठी) असे ठळक अक्षरात लिहून, वरील पत्त्यावर पाठवावेत.
राज्य अभ्यासक्रम आराखडा 2025 (प्राथमिक स्तर) अभिप्राय लिंक
State Curriculum Framework (SCF 2025) Feedback link
शिक्षक, पालक, विद्यार्थी, सर्व समाज घटक राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF 2025) यावर अभिप्राय देऊ शकतात.
ही लिंक दिनांक 27/08/2025 पर्यंत उपलब्ध राहणार आहे.
0 Comments