Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत "विषय सहायक पदे" भरण्यासाठी जाहिरात

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत "विषय सहायक पदे" भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 




संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत "विषय सहायक पदे" शासन पत्र दिनांक २६.०५.२०२५ व दिनांक ३१.०७.२०२५ अन्वये उसनवारी तत्वावर ही पदे भरण्यात येणार आहेत. 


विषय सहायक पदांचे विवरण

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे कार्यालयासाठी एकूण १० पदे, 

सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (गडचिरोली वगळून) ३३ पैकी ३१ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेसाठी प्रत्येकी ०३ या प्रमाणे ९३ पदे, जिल्हा शिक्षण संस्था लातूर करिता ०१ पद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव करिता ०२ पदे असे एकूण ३३ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकरिता ९६ पदे तसेच,


प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई-१० पदे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर-०४ पदे व प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर-०५ पदे अशी एकूण १२५ विषय सहायकांची पदे उसनवारी तत्वावर भरावयाची आहेत.


यासाठी इच्छुक पात्र शिक्षकांनी परिषदेच्या www.maa.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या "विषय सहायक पदासाठी उसनवारी तत्वावर नियुक्ती प्रक्रिया" या टॅबवर दिनांक ०७.०८.२०२५ रोजी सकाळी १०.०० पासून ते दिनांक १५.०८.२०२५ रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत अर्ज सादर करावेत.


उसनवारी तत्त्वावर विषय सहायक पदासाठी निवड प्रक्रिया अर्ज  (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि विभागीय प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईनागपूरछत्रपती संभाजीनगर)

सर्वसाधारण सूचना

उसनवारी तत्त्वावर निवड प्रक्रियेव्दारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि विभागीय प्रादेशिक विद्या प्राधिकरण (मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर) येथे विषय सहायक पदावर काम करण्यास इच्छुक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय अध्यापक विद्यालयातील नियमित शिक्षकांनी खालील सूचना वाचून अर्ज भरावा.

  1. सदरची निवड ही उसनवारी तत्त्वावर असून उसनवारीचा कालावधी संपल्यानंतर त्या पदावर पुढील सेवेच्या कालावधीत कोणताही हक्क असणार नाही.
  2. उसनवारी तत्त्वाच्या कालावधीत कोणताही विशेष भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  3. उसनवारी तत्त्वावरील कालावधीत वेतन व भत्ते मूळ आस्थापनेवर काढण्यात येतील.
  4. उसनवारी तत्त्वावरील कालावधीत संबंधित विषय सहायक यांचे कामकाज समाधानकारक नसल्यास अथवा संस्थेच्या प्रतिमेस/हितास बाधा पोहोचेल असे गैरवर्तन केलेले निदर्शनास आल्यास त्यांची उसनवारी तात्काळ रद्द होवून मूळ आस्थापनेवर रूजू व्हावे लागेल.
  5. उसनवारी तत्त्वाचा कालावधी तीन वर्षांचा असेल किंवा शासनाकडून वेळोवेळी होणाऱ्या निर्देशानुसार त्यात बदल होईल.
  6. शिक्षक निवडताना जिल्हास्तरावर, विभागस्तरावर व राज्यस्तरावर काम करण्याचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
  7. विषय सहायक या पदावर उसनवारी तत्त्वावर निवड झाल्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे / संबंधित प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांनी दिलेल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या पूर्ण करणे बंधनकारक राहील.
  8. उसनवारी तत्त्वासाठी निवड झालेल्या विषय सहायकांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम, 1981 मधील तरतुदीनुसार नैमित्तिक, अर्जित व वैद्यकीय रजा अनुज्ञेय राहतील.
  9. उसनवारी तत्त्वासाठी निवड झालेल्या उमेदवाराने रूजू होताना नियुक्ती प्राधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
  10. उसनवारी तत्त्वासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान ७ वर्षे सेवा झालेली असणे आवश्यक आहे. तसेच सेवानिवृत्तीस तीन वर्षांपेक्षा कमी कालावधी असलेल्या उमेदवारास उसनवारी तत्त्वासाठी अर्ज करता येणार नाही.
  11. उसनवारी तत्त्वावर विषय सहायक पदावर निवड झाल्यानंतर रूजू होताना विहित नमुन्यात बंधपत्र भरून देणे बंधनकारक राहील.
  12. सदर प्रक्रियेत निवड होण्याआधी किंवा नंतर अर्जदारांसंबंधीची प्रक्रिया / नेमणूक कधीही रद्द करण्याचे अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे राहतील.

शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता व इतर सर्व प्रमाणपत्रे तसेच आवश्यक पुरावे मुलाखतीच्या वेळी सादर करावीत. अर्ज करताना आपण या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असलेबाबत सक्षम अधिकाऱ्यास अवगत केल्याचा पुरावा प्राप्त करून ठेवावा आणि मुलाखतीच्या वेळी सादर करावा.


विषय सहायक पदासाठी उसनवारी तत्वावर नियुक्ती प्रक्रिया

रजिस्ट्रेशन कालावधी - 07 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 पर्यंत

विषय सहाय्यक पदासाठी रजिस्ट्रेशन लिंक 👇

https://www.maa.ac.in/index.php?tcf=appointment


अधिकृत वेबसाइट - www.maa.ac.in

Share with your friends👭👬


Post a Comment

0 Comments

close