केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीकरिता SNA-SPARSH प्रणाली अंतर्गत Current (Holding) Account उघडण्यात येणार आहे. समग्र शिक्षा (SAMAGRA), STARS, PM SHRI, PM JANMAN व इतर केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत SNA-SPARSH खात्यांचा वापर करावा लागणार आहे.
भारत सरकारच्या दि.13.07.2023 च्या Office Memorandum नुसार केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीकरिता SNA-SPARSH प्रणाली लागू करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने समग्र शिक्षा या योजनांकरिता SNA-SPARSH प्रणाली लागू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
या अनुषंगाने वित्त विभागाचा शासन निर्णय दि.30.07.2025 नुसार SNA-SPARSH प्रणाली लागू करण्याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-क नुसार केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी SNA-SPARSH प्रणाली अंतर्गत सर्व योजनांचे एकच '0' Balacnce Current (Holding) Account उघडण्याबाबत पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे.
Current (होल्डिंग) खाते उघडणी सर्व राज्य संलग्नित योजना एकत्रित हाताळण्यासाठी एकच '0' Balacnce Current (होल्डिंग) खाते उघडणे आवश्यक. (विशेष सूचना Current (होल्डिंग) खात्यात फक्त वजावटींसंबंधित रक्कम वर्ग करणे, इतर कोणतीही रक्कम वर्ग करू नये.)
तसेच भारत सरकारचे पत्र No.(C.No.13177) V-13022/5/2023-PFMS/7481-7490, dt.11.10.2023 नुसार Bank Account उघडणेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदरचे पत्र सोबत जोडले आहे. संदर्भ क्र.4 अन्वये आपणास यापूर्वी कळविण्यात आले होते. तरी यानुसार आपणास पुनक्ष कळविण्यात येते की, समग्र शिक्षा (SAMAGRA), STARS, PM SHRI, PM JANMAN व इतर केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत SNA-SPARSH प्रणालीच्या अंमलबजावणीकरिता आपल्या अधिपत्याखालील सर्व अंमलबजावणी यंत्रणा (Implementing Agencies) म्हणजेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, BRC, DIET, URC, CRC, SMC, KGBV, नेताजी सुभाष आवासी विद्यालय इ. करिता भारत सरकारच्या दि.11.10.2023 च्या मार्गदर्शक सूचना आणि वित्त विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दि.30.07.2025 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कोणत्याही Nationalized/Schedule Commercial बँकेत Current (Holding) Account उघडण्याबाबतची कार्यवाही त्वरित पूर्ण करण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना निर्देश व्हावेत, ही विनंती.
SNA-SPARSH प्रणाली अंतर्गत Current (Holding) Account उघडणेबाबत परिपत्रक 18 डिसेंबर 2025 - Click Here
SNA-SPARSH प्रणाली अंतर्गत Current (Holding) Account उघडणेबाबत परिपत्रक 20 ऑगस्ट 2025 - Click Here



0 Comments