Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत वाटाणा वाटपाची माहिती सादर करणेबाबत

सभागृहात दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीची दि.२९/०५/२०२६ रोजी आयोजित केलेल्या बैठकीचे इतिवृत्ताच्या अनुषंगाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत वाटाणा वाटपासंबंधित माहिती सादर करणेबाबत.


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२५-२६ या वर्षात आपले जिल्ह्यांतील पात्र असणाऱ्या शाळांमध्ये धान्यादी मालाचे वाटप जिल्हानिहाय नियुक्त पुरवठेदाराकडून करण्यात आलेले असून सदर वाटपामधील वाटाणा वाटपाच्या संदर्भातील माहिती शाळेचे मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने खालीलप्रमाणे सादर करावी.


१. शाळास्तरावर करावयाची कार्यवाही मुख्याध्यापकांनी सोबत जोडलेल्या प्रपत्र ड मध्ये सन २०२५-२६ या कालावधीमध्ये वाटाणा संदर्भाती माहिती अचूकरित्या भरुन शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने जिल्हास्तरावर सादर करावी.


२. जिल्हास्तरावर करावयाची कार्यवाही जिल्ह्यातील सर्व शाळांकडून प्रपत्र-ड मधील माहिती जिल्ह्यांनी तात्काळ प्राप्त करुन घ्यावी. तसेच संकलित केलेले प्रपत्र-ड आपल्या स्तरावर जतन करुन ठेवण्यात यावे. प्राप्त झालेल्या सर्व शाळांची प्रपत्र-ड मधील माहिती प्रपत्र-क मध्ये भरुन केवळ प्रपत्र-क पीडीएफ स्वरुपातील व सॉफ्ट कॉपी ई-मेल द्वारे (Email Id- mdmdep@gmail.com) दिनांक ३१ जुलै, २०२६ पर्यंत शिक्षण संचालनालयास सादर करण्याची करण्यात यावी.


प्रपत्र ड - वाटाण्याचा पुरवठा दर्शविणारे शाळास्तर विवरण पत्र



प्रपत्र क - वाटाण्याचा पुरवठा दर्शविणारा जिल्हास्तरीय एकत्रित गोषवारा


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत वाटाणा वाटपाची माहिती सादर करणेबाबत परिपत्रक - Click Here



प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत वाटाणा वाटपाची माहिती सादर करणेबाबत प्रपत्र क व ड PDF - Click Here 


Post a Comment

0 Comments

close