Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अंगणवाड्या प्राथमिक शाळांच्या कक्षेत...


म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याच्या सूचनांना शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी मान्यता दिली आहे. समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी विविध सूचना केल्या होत्या. यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याविषयी नमूद करण्यात आले होते. डॉ. गिते यांच्या सूचनेला प्रधान सचिवांनी मान्यता दिली असून, त्यानुसार जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सदरचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.adi
केंद्र सरकारने सन २०१८-१९ या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्य
ा मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक गुणवत्तेचा समग्र आराखडा तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी व सूचना करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले. डॉ. नरेश गिते यांनी यावेळी अंगणवाडी शाळांना जोडण्याबाबत सांगितले की, शाळा व अंगणवाडीमध्ये येणाऱ्या मुलांमध्ये जर औपचारिक व पूर्व प्राथमिक शिक्षण योग्य झाले तर ही मुले भविष्यात चांगली प्रगती करतील. अंगणवाडीत पूर्व प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम दिल्यास व त्यावर शिक्षण विभागाचे नियंत्रण ठेवल्यास हा उपक्रम उत्तम प्रकारे राबविता येईल. जिल्ह्यात वर्षापासून समग्र शिक्षा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत गणित व भाषा यावर विशेष भर देण्यात येणार असून मुलभूत वाचन, गणित प्रशिक्षण देऊन याबाबत सनियंत्रण करण्यात येणार आहे. या बैठकीस प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी वैशाली झनकार यांच्यासह माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी, तालुकास्तरावरील सर्व गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

close