Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ऑटो चालकाचा मुलगा ते वयाच्या २१ व्या वर्षी IAS अधिकारी…

त्याच्या घरी एवढी गरिबी होती कि त्याच्या वडिलांनी त्याला चौथ्या वर्गात असताना शिक्षण सोडायला सांगितले. वडिलाला मदत म्हणून त्याने एका हॉटेल मध्ये काम करणे सुरु केले. सोबतच शिक्षण सुरु होतेच.  त्याची ती जिद्दच होती परंतु आयुष्यात करायचं काय हे त्यालाही माहिती नव्हत.

       प्रत्येकाला आयुष्यात एक कीक (प्रेरणा) मिळते. अचानक एक दिवस वडिलाला एका उच्चपदस्थ अधिकार्याने पकडून विनाकारण घरकुल योजणेचा चेक देण्याकरिता त्रास दिला त्या दिवशी याने ठरविले की आपल्याला अधिकारी व्हायचं आहे.

           त्या मुलाचे नाव – अन्सार शेख

 

Watch ANSAR's INTERVIEW --- How to crack UPSC In First Attempt

अन्सार शेख IAS कसा झाला? त्याच्याच शब्दात पहा. संपूर्ण प्रवास  पाहण्यासाठी येथे टच करा.

गाव – जालना (महाराष्ट्र)

UPSC प्रयत्न – पहिल्याच संधीत IAS

वय – २१ वर्ष

श्रेणी – ३६१

हे ही वाचा

देशातील एकमेव उदाहरण - फक्त 2 खोल्या असलेल्या घरातील सख्खे चारही भाऊ-बहिण क्लास 1 अधिकारी IAS & IPS 


          अन्सारला  स्वतःचे घर सुध्दा रहायला नव्हते. जालना येथे दारिद्र रेषेच्या खाली मिळणाऱ्या घरकुलात तो राहत होता. मुस्लिमांना नौकरी कोणी देत नाही असे वडिलांना वाटायचे. यामुळे एक दिवस त्याचे वडील सरळ जिल्हा परिषद शाळेत जाऊन बोलले कि याला शाळेतून काढायचं परंतु त्याचे शिक्षक पुरषोत्तम पडूळकर यांनी या गोष्टीला विरोध केला व अन्सारची शाळा वाचवली. अन्सार आजही त्याच्या शिक्षकास देवा समान मानतो ते नसते तर मी नसतो हे नेहमी बोलताना तो बोलतो. आई शेतात रोजमजुरी करत होती.

        पुणेला शिक्षण घेत असताना अन्सारला त्याचा भाऊ रोजमजुरी करून पैसे पाठवायचा पैस्याची कमी पडल्यास अनासारला त्याची आई शेतात काम करून मदत करायची. दहाव्या वर्गात MSCIT शिकण्याकरिता धाब्यावर सुध्दा अन्सारणे काम केले. सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत तो काम करयचा. दोन तासाची मध्ये सुट्टी मिळायची यामध्ये अन्सार जेवण व कम्प्युटर शिकायचा.


             संपूर्ण अन्सारच्या खानदानीत अन्सार पहिला आहे ज्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अनिस शेख अन्सारचा लहान भाऊ ६ व्या वर्गात असताना नापास झाला त्याने तेव्हा ठरविले मला आता शिकायचे नाही अन्सार हुशार आहे त्याला शिकवायचे व अन्सार अभिमानाने सांगतो कि माझ्या लहान भावाने माझे शिक्षण पूर्ण केले. १० वी,१२वी व पदवी सुरु असताना अन्सारणे बाहेर काम करून शिक्षण पूर्ण केले परंतु UPSC परीक्षेचे शेवटचे दोन वर्ष अन्सारणे बाहेर काम केले नाही त्यामुळे अनिस वर या काळात प्रचंड दबाव होता.

     पहा

अन्सार शेख यांचे गाजलेले भाषण  




 

अन्सारच्या वडिलाला अन्सार IAS झाल्यनंतर हे सुध्दा कळत नव्हत. अन्सारच्या वडिलाने शिक्षणाकरिता आटो सुध्दा विकायचा निर्णय घेतला होता. दहाव्या वर्गातील त्याचे शिक्षक मापारी सर MPSC परीक्षा पास झाले त्यावेळेस अन्सारला स्पर्धा परीक्षा बाबत कळल. माझ्यकडे हरायला तर काही नाही म्हणून मी मोठी परीक्षा निवडली UPSC…

          आणि वयाच्या २१ व्या वर्षी ती परीक्षा पास होऊन अन्सारने इतिहास रचला. १०६८ पैकी ३४ मुस्लीम मुले UPSC पास झाले त्यापैकी अन्सार एक आहे.


अन्सारचा मित्र मुकुंद सांगतो कि UPSC रिझल्ट लागल्यावर मी अन्सारला पहिला निरोप दिला कि तू पास झाला. अन्सार आनंदात होता परंतु तेव्हा तेव्हा सुध्दा आनंद व्यक्त करायला त्याच्याकडे पैसे नव्हते. सर्व मित्रांनी त्याला तेव्हा पार्टी मिळून पार्टी दिली.



Post a Comment

0 Comments

close