फूडचं सेवन, आरामदायी जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे पोटाचा घेर वाढतो. पोटाचा आकार वाढू लागला की, मग अस्वस्थ व्हायला होतं. उत्तानपादासन हे आसन पोटाचा थुलथुलीतपणा दूर करून लठ्ठपणाला अटकाव करतं. हे आसन करण्यामुळे पोटाच्या अवतीभवतीच्या स्नायूंना मजबुती मिळते. मजबूत स्नायूंमुळे पचनशक्ती वाढते. पचनशक्ती चांगली असेल तर बद्धकोष्ठ, गॅस, ढेकर येणं, अपचन, भूक न लागणं हे पोटाशी संबंधित विकार बरे होण्यास मदत होते. बेंबी योग्य जागी राहण्यात हे आसन सहाय्यकारी ठरतं. हे आसन करत राहिल्यानं हृदय, फुफ्फुस कार्यक्षम होतात. कमी रक्तदाब, शरीराला, मनाला जाणवणारी सुस्ती यामध्येही हे आसन फायदेशीर ठरतं. चेहऱ्यावरील पीटीका, पुटकुळ्या यांना अटकाव करण्यात सहाय्यभूत ठरणारं हे आसन असून, त्याममुळे चेहऱ्यावरचा तजेला कायम राहतो. केस गळणं, केस पांढरे होणं या गोष्टी थांबवण्यातही या आसनामुळे मदत होते.
कुणी करू नये?
कंबरेचं दुखणं, हर्निया आणि उच्च रक्तदाब यापैकी कुठलाही त्रास तुम्हाला असेल तर हे आसन करू नये.
कसं कराल?
सरळ, उताणं झोपा. तुमचे हात जमिनीवर जांघेजवळ ठेवा. हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले असतील. आता श्वास घेत-घेत, ६० अंशांचा कोन होईल इथपर्यंत पाय उचला. थोडा वेळ थांबा. या क्रियेत हाताचे तळवे जमिनीवर टेकलेलेच राहतील. श्वासोच्छ्वास सामान्य ठेवून प्रसन्न चित्तानं, जितका वेळ शक्य होईल तितका वेळ या आसनात थांबा. काही वेळ थांबल्यानंतर तुम्हाला पोटाच्या वरच्या बाजूला कंपनं जाणवू लागतील. मग पुन्हा पूर्वस्थितीत येताना श्वास सोडत हळूहळू पाय खाली आणा. ही क्रिया करताना तुमचं डोकं जागेवरुन हलणार नाही याची काळजी घ्या. दिवसातून दोन ते तीन वेळा हे आसन करा. सुरुवातीला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करा.
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


0 Comments