अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाइल फोन; कामकाजास सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, नगर
राज्य सरकारने राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाइल देण्याचा निर्णय घेतला आहे. नगर जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५ हजार ७४७ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाइल दिले आहेत. अंगणवाड्यांतील दैनंदिन कामकाज या मोबाइलद्वारे करण्यात येणार आहे. साधारण जून महिन्यापासून जिल्ह्यातील अंगणवाड्यात या पद्धतीने कामकाज सुरू होणार आहे.
या नव्या निर्णयानुसार कशा पद्धतीने कामकाज करायचे, याबाबत कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने विकसित केलेल्या मोबाइल अॅपद्वार कामकाज करण्यात येणार आहे. नोंदवहीऐवजी आता मोबाइल अॅपच्या माध्यमातून या स्मार्ट फोनमध्येच बालकांचे लसीकरण तसेच अन्य प्रकारच्या नोंदी घेण्यात येणार आहे. त्यामुळे कागदपत्रांचा ताण कमी होणार आहे. अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधी वाटप, बालकांचे वेळोवेळी वजन घेणे, बालकांचे वजन, लसीकरण यासह इतर बाबींची कामे असतात. या सर्व कामांचा अहवाल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागतो. दुर्गम भागात रस्त्यांची व वाहनांची कमतरता लक्षात घेता असे अहवाल वेळेत सादर करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर कायमच असते. आता मात्र मोबाइलद्वारेच कामकाज केले जाणार आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय थांबणार आहे. तसेच राज्यस्तरावरही अंगणवाडीतील कामकाजाची माहिती घेता येणार आहे.
--
वेळखाऊ कामांपासून सुटका
राज्य सरकारकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सरकारी कार्यालयातील कामकाज अचूक आणि पारदर्शकपणे करण्यासाठी ऑनलाइनवर भर देण्यात आला आहे. कागदांवर नोंदी घेऊन फाइल तयार करणे, नोंदवह्यांवर नोंदी घेणे, अहवाल पाठवणे, अहवाल मागवणे या वेळखाऊ कामांची आवश्यकता आता राहणार नाही. अंगणवाड्यांतील दैनंदिन कामे आता मोबाइलद्वारे केली जाणार आहेत. मोबाइल अॅपमध्ये माहिती नियमितपणे अपडेट करावी लागणार आहे. त्यामुळे कोणत्या अंगणवाडीत किती बालके आहेत, त्यांना कोणता आहार दिला जातो, बालकांचे लसीकरण होत आहे का, बालकांचे वजन किती आहे या बाबींची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


0 Comments