कोळकी/ प्रतिनिधी : राज्यातील शिक्षक भरतीसाठी अंतिम टप्पा सुरू झाला आहे. पवित्र पोर्टलवर 31 मे पर्यंत उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार आहे. 1 ते 10 जून दरम्यान निकाल प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 10 जून ते 16 जून दरम्यान खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. 10 जून पासून सार्वजनिक तर 17 जून पासून खाजगी संस्थांमध्ये उमेदवारांना थेट शाळेत रुजू होता येणार आहे.
शिक्षकांना पवित्र पोर्टल वर प्राधान्यक्रम भरण्यासाठी महत्वाच्या मार्गदर्शक सूचना तसेच व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उमेदवारांना मुलाखती शिवाय नियुक्ती देणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी शाळा तसेच मुलाखतीसह नियुक्त्या देणार्या खाजगी संस्था अशा दोन भागात प्राधान्यक्रम देता येईल.
पवित्र पोर्टल वर हेतुपुरस्सर खोटी, चुकीची अथवा अपूर्ण माहिती दिली, तसेच खरी माहिती लपवून ठेवली किंवा नोंदींमध्ये अनधिकृतपणे खाडाखोड केली, बनावट दाखले सादर केले, तर असा गैरवर्तणूक करणारा उमेदवार निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरविण्यात येणार आहे. खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये एका जागेसाठी दहा याप्रमाणे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येणार आहे आणि एका उमेदवाराला दहा ठिकाणी मुलाखतीला जाता येणार आहे.


1 Comments
ज्यांचे फाॅर्म भरणे बाकी आहे त्यांचे काय.त्यांना नोकरी नको द्यायला हवी का?माझा फाॅर्म भरायचा राहिलाय.माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना TET नाही. म्हणून माझा फाॅर्म राहिला कारण फाॅर्म भरताना TET नंबर मागितला. मी M.A.,B.ED आहे म्हणून मला TET नाही मग आता काय करायचं. नोकरी कशी मिळेल. कृपया याची नोंद घेवून योग्य पर्याय सुचवला तर खूप मदत होईल.
ReplyDelete