नवी दिल्ली : वृत्तसंस्था- गुगल क्रोम आपल्या रोजच्याच इंटरनेट वापरातील महत्वाचे ब्राऊझर आहे . १०० मधले ८५ लोक गुगल क्रोमच्या सहाय्याने इंटरनेट वापरतात. गूगलचे क्रोम ब्राउझर इंटरनेटच्या इतर ब्राउझरच्या तुलनेत फास्ट चालते. गुगल क्रोममध्ये काही महत्वाचे फीचर्स आहेत जे रोजच्या इंटरनेट वापरात उपयुक्त आहेत. मात्र काही फीचर्सबाबत आपल्याला माहिती नसते. जाणून घेऊया गुगल क्रोममधील अशाच काही फीचर्सविषयी –
*साईट ओपन करण्यासाठी*–
सिस्टम ओपन केल्यावर लगेच जर आपली आवडती साईट ओपन करायची असेल. तर क्रोम सेटींगमध्ये जाऊन on startup वर क्लिक करा. यामध्ये काही पर्याय दिसतील. ज्यामध्ये Open a specific page or set of pages वर क्लीक करा. त्यानंतर क्रोम ओपन केल्यावर तुम्हालाआवश्यक असलेली साईट ओपन होईल.
*चुकून एखादा महत्त्वाचा टॅब बंद झाल्यास*–
काम करताना युजर्स अनेक टॅब ओपन करतात. मात्र कधी कधी चुकून एखादा महत्त्वाचा टॅब बंद होतो. टॅब पुन्हा आणण्यासाठी नवीन टॅब ओपन करून Ctrl+Shift सोबत T क्लिक करा.
*गणितेही सोडवण्यासाठी* Chrome चा Omnibox (नवीन टॅब ओपन केल्यावर जो address bar सारखा दिसतो) फक्त सर्च करण्यासाठी नाही तर गणितं सोडवण्यासाठी त्याचा वापर करता येतो.
*एका टॅबवरून दुसऱ्या टॅबवर पटकन जाण्यासाठी* –
एका टॅबवरून दुसऱ्या टॅबवर पटकन जाण्यासाठी Ctrl Key वापरा .Ctrl Key चा वापर करून १ पासून ९ पर्यंत वेगवेगळ्या टॅबवर जाता येतं.
*वर्ड सर्च करण्यासाठी*–
एखादा मेसेज वाचताना मध्येच आपल्याला माहीत नसलेला एखादा शब्द येतो. त्यावेळी युजर्स त्या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी तो शब्द कॉपी करून सर्च करतात. मात्र असं करण्यापेक्षा तो शब्द सिलेक्ट करून राईट क्लिक करा. त्यानंतर गुगल सर्चचा ऑप्शन आपोआपचं येईल.
*स्मार्टफोनमधील क्रोममध्ये* एखादा शब्द सर्च करणं देखील सोपं आहे. जो शब्द शोधायचा आहे तो थोडावेळ प्रेस करा म्हणजे सिलेक्ट आणि कॉपीसारखा पर्याय मिळेल आणि ते सर्च करता येईल.


0 Comments