Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अंगणवाडी सेविकांना मोबाईल मिळाला पण... रेंजसाठी वणवण

ऑनलाइन नोंदीच्या कामाला नेटवर्कचा खो
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
अंगणवाडीचे काम ग्रामीणस्तरावरही ऑनलाइन होण्यासाठी तसेच त्याचदिवशी सेविकांचा अहवाल आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभागाला मिळावा, यासाठी ठाण्यातील ३६९५ अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात आले. मात्र ग्रामीण परिसरात नेटवर्क नसल्यामुळे एक महिना उलटूनही ऑनलाइन कामास सुरुवात न झाल्याने उपक्रमाचा हेतूच फसल्याचे दिसून येते.
ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण अशा ३ हजार ६९५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या सेविकांचे पूरक पोषण आहार, बालकांचे वजन व उंची, स्तनदा माता व गरोदरमातांची नोंदी, लसीकरण, मुलींच्या नोंदीचा, कुपोषित बालकांची माहितीचा अहवाल लिखित स्वरूपात ठेवला जातो. मात्र पेपरलेस काम करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या विभागाला यामध्ये अपयश आल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यापासून सुरू होणारे ऑनलाइन नोंदीचे काम अद्यापही सुरू झालेले नाही.
या सेविकांना टप्प्याटप्प्यात मोबाइल हाताळण्याबाबत तसेच ऑनलाइन माहिती पाठविण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले होते. सरकारकडून एप्रिल-मे मध्ये या ३ हजार ६९५ सेविकांना मोबाइलही देण्यात आले. कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या इंटरनेट डाटाची पुढील सहा महिन्यांची अतिरिक्त रक्कम सेविकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. मात्र नेटवर्क नसल्यामुळे तसेच मोबाइल हाताळणे कठीण जात असल्यामुळे एक महिना उलटूनही या ऑनलाइन कामास सुरुवात झालेली नाही.
रेंज नसणे, भारनियमन, इंटरनेची सुविधा अशा अनेक अडचणींचा सामना सध्या या सेविकांना करावा लागत आहे. तर रेंज शोधण्यासाठी परिसरात मोबाइल घेऊन फिरावे लागत आहे.

Post a Comment

2 Comments

close