Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यातील 300 आदर्श शाळा होणार दर शनिवारी दप्तरमुक्त....

राज्यातील ३०० जिल्हापरिषद शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. या शाळांचा शैक्षणिक, भौतिक विकास करण्यात येणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
Download GR Click Here
या निवडलेल्या शाळा पहिली ते सातवीच्या असून त्यांना आठवीचे वर्ग जोडण्यात येणार आहेत. या शाळांचा विविध स्तरावर विकास केला जाणार आहे. यात भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी आणि विज्ञान प्रयोगशाळा यांचा समावेश असणार आहे. 

 शैक्षणिक सुविधांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या चौकटी बाहेरील शिक्षण दिले जाणार आहे. यात वाचनावर विशेष भर देण्यात येणार आहे तर विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मुलभूत संकल्पना शिकविल्या जाणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणांचे कौशल्यही शिकविले जाणार आहे.
त्यामुळे दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरेल असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments

close