मागील काही दिवसांत मुंबई येथे राज्य सरकारच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्याप्रसंगी अनेक नेत्यांच्या ते संपर्कात आले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली होती.
हे ही वाचा.
तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह इतर अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गावी आल्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली असता त्यांनी आपली चाचणी करुन घेतली असता त्यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यानंतर घरातील सर्वांची कोरोना चाचणी केली असता त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. घरातील बाकी सर्व मंडळींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. सद्या त्यांची प्रकृती उत्तम असून लवकरच ते कोरोनावर मात करतील.
हे ही वाचा.
रणजितसिंह डिसले गुरुजी हे ग्लोबल टीचर प्राइझ हा पुरस्कार मिळविणारे पहिलेच भारतीय आहेत. त्यांनी राबविलेले उपक्रम QR Coded Books व Let's cross the border मुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. लेट्स क्रास द बाॅर्डर या त्यांच्या उपक्रमामुळे जगातील अशांत, युद्धजन्य देशात शांतता स्थापित होण्यास मदत होणार आहे. त्यांनी जवळपास ५०,००० हजारांची पीस आर्मी स्थापन केली आहे. तसेच त्यांनी राबविलेले QR Coded Books ११ देशातील विद्यार्थी वापरत आहेत.



0 Comments