Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फिट इंडिया मोहिम नोंदणी... शाळा व शिक्षक नोंदणी कशी करावी? रजिस्ट्रेशन लिंक व डेमो व्हिडिओ पहा.

इ.१ली ते इ.१२वी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांची फिटनेस टेस्ट घेतली जाणार असून त्याचा रिपोर्ट खेलो इंडिया च्या वेबसाईट वर भरावयाचा आहे. त्यामुळे खेलो इंडिया फिट इंडिया मोहिमेअंतर्गत सर्व शाळांची व शिक्षकांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. २७ डिसेंबर पर्यंत फक्त ५०% शाळांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे १० जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही.


 विषय:- फिट इंडिया मोहिमेअंतर्गत शाळा नोंदणी करणे बाबत.

परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.

10 जानेवारी 21 अंतिम पर्यंत मुदतवाढ परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.


 शाळांची नोंदणी कशी कराल?

केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सूचनेनुसार फिट  इंडिया मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता 1 ली ते 12 वीच्या शाळांची नोंदणी मुख्याध्यापक /प्राचार्यांनी स्वतः फिट इंडियाच्या  पुढील पोर्टलवर जाऊन करायची आहे. नोंदणी करताना computer/Labtop चाच वापर करावा. 

शाळांची नोंदणी करण्यासाठी येथे टच करा.

 

शाळा नोंदणी बाबतचा अधिकृत डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी येथे टच करा.


शिक्षकांची नोंदणी कशी कराल?


खेलो  इंडियाच्या app वर 1 ली ते 12 वीच्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकांनी आपली नोंदणी करायची आहे. शाळेत शारीरिक शिक्षण या विषयाचा शिक्षक उपलब्ध नसल्यास मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी या कामासाठी एका सहा. शिक्षकाची नियुक्ती करावी. या कामासाठी नियुक्त सहा. शिक्षकाने आपल्या android फोनवर Khelo India School version  हे app डाऊनलोड करावे. या app वरुनच शिक्षक नोंदणी करता येईल.

IOS मोबाईल असणाऱ्या शिक्षकांनी app डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.


Andriod मोबाईल असणाऱ्या शिक्षकांनी app डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.




शिक्षक नोंदणीचा अधिकृत demo व्हिडिओ पाहण्यासाठी येथे टच करा. 


या व्हिडिओच्या मदतीने आपल्याला शिक्षक नोंदणी करता येईल. शाळा व शिक्षक नोंदणीची प्रक्रिया 15 डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करावी. (मुदतवाढ 10 जानेवारी) नोंदणी  करताना सर्व जिल्ह्यातील आयटी शिक्षकांनी याबाबत पुढाकार घेऊन शाळा व शिक्षक नोंदणीसाठी शाळांना सहकार्य करावे. यापूर्वी शाळांची नोंदणी केली असल्यास पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी श्री. आधार मोरे रिजनल मॅनेजर, खेलो इंडिया मो. 8154092339 व रोशन तिवारी मो.9899683557  यांच्याशी संपर्क साधता येईल.

  संचालक 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे



Post a Comment

0 Comments

close