Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रिय रणजित गुरूजी सप्रेम नमस्कार...

प्रिय रणजित गुरूजी सप्रेम नमस्कार...

तुम्ही काही तरी अविश्वसनीय करून दाखवलंत.तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून शिक्षण कसं सहज सुलभ मनोरंजक करता येईल ते तुम्ही केलंत.खूप लोक कष्ट घेत आहेत,कठीण परिस्थितीतही नवनवीन गोष्टी करण्यासाठी. शासन समाज यांच्या कडून कुठलीही अपेक्षा न ठेवता आपापल्या परीने झगडत आहेत चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी.पण काही तरी असंच अघटित घडणं गरजेचं होतं.होय अघटितच आहे जे तुम्ही घडवलंत.कारण जि.प.शिक्षक म्हणजे पार.....बोलूच ने काही आमच्या परिस्थिती विषयी ईतकी वाईट अवस्था. पण तुम्ही आज देशातच काय सातासमुद्रापार जाऊन जगासमोर आमची मान ताठ केली.सर्वांच्या समोर होय साहेब, होय साहेब म्हणत  ती  सतत एवढी वाकली होती कधी ताठ होईल की नाही शंका होती.पण तुम्ही ती ताठच नाही तर उंचावलीत अभिमानानं.तुम्ही आमच्या शेजारी राहून एवढं मोठं कार्य करत होता आणि सोशल मिडियावर एकदाही  तुमची प्रसिद्धी केली नाही हे मात्र आवडलं नाही बरंका आम्हाला.  काम कमी करा पण प्रसिद्धी खूप पण तुम्ही गुपचूप सर्व जगासमोर मांडलंत.दररोज दहापाच फोटो सर्व ग्रुपवर तुम्ही पाठवायल्या हव्या होत्या. पण असो, तुम्हाला सवयच असेल कामच करून दाखवायची.थोड्याशा हळदकुंडानं पिवळे व्हायला,तुम्ही माझ्या सारखे थोडेच आहात.आणि मनाचा मोठेपणा कितीहो चक्क सात कोटी रूपये 
वाटून टाकलेत.मी तर एखादी स्कोडा घेतली असती.दहावीस तोळे हातात गळ्यात घातलं असतं.एखादा टोलेजंग बंगला वगैरे, काय काय करता आलं असतं पण तुम्ही चक्क एवढे पैसे वाटून टाकलेत.मागे एक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गुरुजी भेटले होते  चांगले सहासात ईन्क्रीमेंट जास्त मिळाले पगार केवढा वाढला वगैरे सांगत होते आणि पंचवीस वर्ष हातात खडू न घेता हे सर्व केलं हे अभिमानानं त्यांनी सांगितलं.तसं तुमचंही दिसतंय.तुम्हीही खडू घेतला नाहीत पण संगणक मुलांच्या हातात दिलात.आम्ही पाहिलं तुमची मुलं जगातल्या कुठल्याही देशातील शाळेतील मुलांशी संवाद साधत होती.कुठंही शिकता यावं म्हणून तुम्ही क्यु आर कोडींग केलंत.पार पार बदलून टाकलंत रटाळ शिक्षण.कमी वयात फार करून दाखवलंत तुम्ही. स्व सुखाच्या बाहेर जाऊन तुम्ही हा प्रवास केलात हे तुमच्या दातृत्वावरून लक्षात आलंच आमच्या...

तुमच्या कडून थोडी तरी प्रेरणा आम्ही नक्की घेवू.स्वतःलातरी बदलवण्याची...

धन्यवाद..

मलवाडे मदन.शे.
जि.प.शिक्षक.
हे ही वाचा
*रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्याबद्दल जाणून घेवूया*








Post a Comment

0 Comments

close