Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ शिक्षक व विद्यार्थी नावनोंदणी करण्यासाठी येथे टच करा. . National Toy Fair 2021

विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देणे या हेतूने आर्टस आणि अस्थेटिक्स विभाग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचेमार्फत देशातील पहिली राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ National Toy Fair 2021 चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दि.27.02.2021ते 02.03.2021 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे.




          शिक्षक आणि विद्यार्थी यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या खेळण्यांचे फोटो आणि व्हिडिओ यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आभासी पद्धतीने होणाऱ्या जत्रेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. तसेच राज्यस्तरीय खेळणी / गेम निर्मिती स्पर्धेत निःशुल्क सहभाग घेता येईल.

सदर कार्यालयामार्फत राज्यातील सर्व  शिक्षक आणि विद्यार्थी यांना राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ मध्ये उत्कृष्टरित्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल खेळणी, डिजिटल गेम्स,रोबोटिक्स यासंदर्भात तज्ञ मार्गदर्शकाद्वारे मार्गदर्शन  देण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांनी मोफत होणाऱ्या कार्यशाळेसाठी नावनोंदणी अवश्य करावी. 

विद्यार्थी व शिक्षक यांना या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे

      *नोंदणी लिंक-*

      विद्यार्थी (इ.१ली ते १२वी) यांचेसाठी नोंदणी लिंकhttps://forms.gle/hgzt79SHWBLfJkMHA




     शिक्षक यांचेसाठी नोंदणी लिंक - https://forms.gle/AaPE4trrwgeSDGgf9

Post a Comment

0 Comments

close