Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*मैद्याचे पदार्थ खाताय? तर हे नक्की वाचा. काय आहेत मैदा खाण्याचे दुष्परिणाम* why Maida is bad for you



खारी, टोस्ट, पाव, ब्रेड चवीने खातो ते सगळं मैद्यापासून बनतं. हे ही महिती असेलच! बाजारात 80 टक्के बेकरी पदार्थ मैद्यापासून तयार केलेले असतात. मैदा हा गव्हापासूनच बनतो. गव्हाचा पोषक भाग फेकला जातोय व शरीराला घातक असलेला भाग म्हणजे पाढंरे पीठ त्याला मैदा म्हणतो आपण खातो. गव्हाच्या पीठात फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन ‘इ’, व्हिटॅमिन “बी-6′ मॅग्नेशिअम असतात.

पण मैद्याचं असं नसतं. मैदा तयार करताना गव्हाच्या दाण्याचं कव्हरिंग पूर्णपणे काढल जातं व बारीक दळलं जातं आणि पोषक तत्वे नष्ट होतात.

काय आहेत मैदा खाण्याचे दुष्परिणाम?


1.मैदा नियमित खाल्ल्यानं शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते. वारंवार आजारी पडण्याची शक्‍यता असते.

2.मैद्यात ग्लुटन असतं. गव्हाच्या पिठात मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटिन असतं. मैद्यात हे दोन्ही नसतात. मैदा फुड ऍलर्जी तयार करतं.

3.मैद्यात फायबर नसल्यानं पोट नीट साफ होत नाही. कॉन्स्टिपॅशनचा त्रास जाणवतो.

4.मैद्यात फायबर नसतात. पचवयाला खूप जड असते व सतत खाल्याने काही भाग आतड्यांना चिकटून राहतो.

5.मैद्यात खूप प्रमाणात स्टार्च असतं. याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईडची पातळी वाढते.

6.मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने शुगर लेव्हल वाढते. कारण यात हाय ग्लायसेमिक इंडेक्‍स असतात.

7.मैदा बनविताना सोडीयम मेटा बिसल्फेट आणि बेंझॉइक ऍसिडचा उपयोग केला जातो. जे गरोदर महिला आणि लहान मुलांना अपायकारक आहे.

8.जास्त मैद्याचं सेवन केल्याने वजन वाढी तर होतेच. पण किडनी आणि लिव्हरला नुकसानदायक आहे.

9.मैदा शरीरासाठी एक स्लो पॅशन सारखा आहे. मैद्याच्या ऐवजी आपण नाचणी, गहू, बाजरी, ज्वारी पीठाचा उपयोग करून विविध पदार्थ तयार करू शकतो.

Tags
मैदा खाण्याचे दुष्परिणाम, आरोग्य मंत्र, Health, 

Post a Comment

0 Comments

close