सद्या थंडीचे दिवस आहेत. अति थंडीने वात विकार वाढतात. त्यामुळे काळजी घ्यावी.
शरीरातील थंडी घालविण्यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे. याची माहिती आज आपण घेवूया.
*उपाय -----*
१) आहारात आलं, काळीमिरी, लवंग, हिंग, सुंठ, लसूण, कांदे इ. गरम मसाल्याचे पदार्थ वापरा.
२) ज्वारी, बाजरीची गरम गरम भाकरी खा.
३) गव्हाची बीन तेलाची रोटी खा.
४) पपई, शेवगा पाने / शेंगा खा.
५) कारळी, मेथी इ. कडू खा.
६) चणे, वाटाणे, शेंगदाणे भाजून गुळासोबत खा.
७) जास्त थंडी लागल्यास वारंवार चहा प्रमाणे गरम गरम पाणी प्या. मात्र चहा प्रमाणातच घ्या.
८) चणे / लसूण काढा प्या.
९) मध + आलंरस + तुळस रस + हळद घ्या.
१०) व्यायाम , रनिंग, योगासने, जाँगिंग, प्राणायाम करा.
११) हातपाय घासा, गरम करा.
१२) टाळ्या वाजवा. किमान २/३ मिनिटे.
१३) शरीराला खोबरेल / तिळाच्या तेलाने माँलिश करा. नंतर गरम गरम पाण्याने अंग शेकवत आंघोळ करा.
१४) साबण वापर कमी करा. नाहीतर त्वचा फाटेल.
१५) अंगभर उबदार कपडे घाला. कान बांधा.
१६) कोरफड जेल चेहरा व अंगाला लावा. त्वचा मुलायम राहील.
१७) नाकात तुप किंवा खोबरेल तेल लावा.
१८) जास्त थंडी लागल्यास वारंवार उजव्या नाकपुडीने सावकाश दीर्घ श्वास घ्या आणि उजव्याच नाकपुडीने सोडा.
Tags
थंडी, हिवाळा, आरोग्य मंत्र, Health, सोपे घरगुती उपाय,



0 Comments