Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात रणजितसिंह डिसले यांची मुलाखत... दि. ९ फेब्रुवारी , १० फेब्रुवारी व ११ फेब्रुवारी रोजी सकाळी 7.25 वाजता

मुंबई, दि.8:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात जागतिक पुरस्कार विजेते शिक्षक  रणजितसिंह डिसले यांची 'आधुनिक व दर्जेदार शिक्षण' या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दिनांक 9, बुधवार दिनांक 10 व गुरूवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

ऑल इंडिया रेडिओ चे सर्व चॅनेल हेडफोन शिवाय ऐकण्यासाठी येथे टच करा. 


काय असेल मुलाखतीमध्ये? 

ग्लोबल टीचर अवॅार्ड पुरस्कार विजेत्या शिक्षकाचा पुरस्कार मिळाल्यानंतरच्या भावना , या पुरस्काराची नेमकी पात्रता, निवड पद्धती, हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नेमका आयुष्यात झालेला बदल, जिल्हा परिषद शाळेत तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी केलेले शैक्षणिक प्रयोग, क्विक रिस्पॉन्स (क्यूआर) कोडचा शालेय शिक्षणासाठी वापर करण्याची कल्पना, स्काइप इन क्लासरूम हा उपक्रम, शिक्षणपद्धतीत  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा यासाठीच्या उपाययोजना आदी विषयांची माहिती श्री. डिसले यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे. 

डिसले गुरुजी यांनी राबविलेल्या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे टच करा. 



*Join with us*

* join with Telegram -    t.me/shaleyshikshan*

*Facebook Group - https://www.facebook.com/educatoinalnews/*


Read - 


अवश्य वाचा.







*रणजितसिंह डिसले गुरुजी यांचे खूप खूप अभिनंदन*
💐💐💐💐






Post a Comment

0 Comments

close