Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कान स्वच्छ करण्याची योग्य पध्दत

कान स्वच्छ नसतील तर कान दुखणे, खाज सुटणे, जळजळ होणे किंवा बहिरापणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपण आपला कान वेळोवेळी स्वच्छ करणे खूप महत्वाचे असते. कान साफ कसे करावे? हे जाणून घेऊया... 

1) *गरम पाणी* : प्रथम पाणी कोमट करून ते कापसाच्या मदतीने कानात टाका. कान थोडा वेळ तसाच राहू द्या आणि काही सेकंदांनंतर, कान उलट करा आणि पाणी बाहेर काढा. 

2) *तेल* : ऑलिव, शेंगदाणा किंवा मोहरीच्या तेलात थोडासा लसूण घालून गरम करा. आता हे तेल कोमट झाल्यावर ते कापसाच्या साहाय्याने कानात घालून थोड्यावेळ तसेच ठेवा. 

3) *कांद्याचा रस* : थोडा गरम करून कांद्याचा रस काढा. आता ड्रॉपर किंवा कापसाच्या मदतीने कांद्याच्या रसातील काही थेंब कानात घाला. 

4) *मीठ आणि पाणी* : गरम पाण्यात मीठ मिसळून एकजीव करून घ्या. आता काही थेंब कापसाच्या मदतीने कानात घाला आणि नंतर कान उलटा करून पाणी काढून टाका. 

लक्षात ठेवा की, वरील पद्धती कान दुखणे किंवा खरचटने आणि जखमा झाल्यास अवलंबू नका.



 

Post a Comment

0 Comments

close